Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Saam Tv
मनोरंजन बातम्या

TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील कलाकाराला सेटवर दुखापत, डॉक्टरांनी दिला 'हा' सल्ला

मालिकेतील चर्चा इतर कोणत्याही कलाकाराची होत नसून चंपक चाचा म्हणजेच अमित भट्ट याची चर्चा होत आहे. चंपक चाचाला सेटवरच दुखापत झाल्याचे वृत्त आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: गेले १४ वर्ष 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिका भारी चर्चेत आहे. बऱ्याच कलाकारांनी मालिकेतून काढता पाय घेतला आहे. त्यांच्या जागी सध्या बरेच नवे चेहरे प्रेक्षकांना दिसत आहेत. प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी ही मालिका कोणताच चान्स सोडत नाही. प्रेक्षकांना या मालिकेतील प्रत्येक कलाकाराची माहिती जाणून घेण्यासाठी फारच इच्छा आहे.

यावेळी मालिकेतील चर्चा इतर कोणत्याही कलाकाराची होत नसून चंपक चाचा म्हणजेच अमित भट्ट याची चर्चा होत आहे. चंपक चाचाला सेटवरच दुखापत झाल्याचे वृत्त आहे. मालिकेतील बऱ्याच कलाकारांची चर्चा सोशल मीडियावर होत असते. दिशा वकानी (दया बेन) पासून ते शैलेश लोढा (तारक मेहता) पर्यंत हे कलाकार मालिकेतून बाहेर पडले आहेत. त्यांच्या जाण्याने मालिकेला चांगलाच फटका बसला हे नक्की.

चंपक चाचा जखमी झाल्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. यावेळी चंपक चाचाने कार्यक्रम सोडला नसून त्याला डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीप्रमाणे, शूटिंग सेटवरच चंपक चाचाला दुखापत झाल्याचे कळत आहे. सध्या तरी डॉक्टरांनी चंपक चाचाला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. याच कारणामुळे सध्या चंपक चाचा मालिकेत दिसत नाही.

ही दुखापत चंपक चाचाला एका शुटिंग दरम्यान झालेली आहे, 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चा एक सीन शूट होत होता, ज्यासाठी चंपक चाचाला पळून जावं लागलं होतं. यादरम्यान त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला आणि त्याला खूप दुखापत झाली.

आता त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. चंपक चाचाची प्रकृती पाहून निर्मात्यांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे. शोमधील सर्वात वयस्कर व्यक्तिरेखा साकारणाऱ्या चंपक चाचाने बरे झाल्यानंतरच सेटवर परतावे, अशी मालिकेतील सदस्यांची इच्छा आहे.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अलीकडेच या शोला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. संपूर्ण टीमने केक कापून हा आनंद साजरा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Kidney Stone: टोमॅटो खाल्ल्याने किडनीमध्ये स्टोन होतो? डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Gold Price Today: खुशखबर! ऐन गणेशोत्सवात सोन्याच्या दरात मोठी घसरण! 18K, 22K आणि 24K सोन्याचे आजचे दर वाचा

Garuda Purana: मृत्यूनंतर आत्म्याला नवीन शरीर किती दिवसांनी मिळतं? गरुड पुराणात दिलीये माहिती

Bipasha Basu: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; तुकाराम मुंढेंना टॅग करत केली कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT