Swapnil joshi movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swapnil Joshi : निर्माता आणि अभिनेता म्हणून २०२४ सगळ्यात जास्त कमाई करणारा कलाकार ठरला स्वप्नील जोशी !

Swapnil Joshi Movie : अभिनेता स्वप्नील जोशी नेहमीच प्रेक्षकांसाठी काही ना काही वेगळे प्रयोग घेऊन येत असतो. त्याच्या चित्रपटाचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षी स्वप्नीलने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Swapnil Joshi : २०२४ वर्षाला निरोप देताना अनेक कलाकारांसाठी हे वर्ष खास गेले आहे. बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणारे मराठी मधले अनेक चित्रपट चर्चेत देखील आले अश्यातच निर्माता आणि अभिनेता म्हणून स्वप्नील जोशीच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई तर केली पण हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाययेस्ट ग्रोसिग फिल्म ठरले.

निर्माता म्हणून स्वप्नील जोशी ने २०२४ वर्षात " नाच गं घुमा " चित्रपटाची निर्मिती केली आणि हा चित्रपट या वर्षातला सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला तसेच या चित्रपटासाठी बॉक्स ऑफिसबाहेर हाऊसफुल्लचे पोस्टर लावण्यात आले होते. जगभरात या चित्रपटाने प्रेक्षकांचं प्रेम मिळवत उत्तम कामे केली.

त्यानंतर स्वप्नीलने बहुचर्चित " नवरा माझा नवसाचा 2 " चित्रपटातून अभिनेता म्हणून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन तर केलं. तसेच हा चित्रपट मराठीतील सगळ्यात जास्त दिवस चित्रपटगृहात राहणार चित्रपट ठरला. स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून त्याने आणि बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.

वर्ष संपताना स्वप्नील जोशी हा या वर्षातला सगळ्यात हाययेस्ट ग्रोसिग फिल्म देणारा निर्माता आणि अभिनेता ठरला आहे. आगमी वर्षात स्वप्नील आता काय घेऊन येणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, स्वप्नील नववर्षात १७ जानेवारी रोजी जिलबी या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तर, १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या प्रसाद ओक दिग्दर्शित सुशीला सुजीत या चित्रपटात देखील स्वप्नील जोशी प्रमुख भूमिका साकारणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कहां गायब हो गये ये लोग? जगदीप धनखड यांच्यानंतर आणखी एकजण बेपत्ता, ठाकरेंच्या खासदाराचा खळबळजनक आरोप

Home Beauty Remedies: चेहऱ्यावर बटर लावल्याने तुम्हाला हे फायदे मिळतील, त्वचा राहिल चमकदार

Border 2: सनी देओलला मोठा झटका! 'बॉर्डर 2'ची रिलीजची तारीख अचानक बदलली, अभिनेता म्हणाला...

Disha Patani: दिशा पटानीचा 'सुपरबोल्ड' लूक; फोटोंनी उडवली झोप

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT