IB 71 Teaser Out Saam TV
मनोरंजन बातम्या

IB 71 Teaser Out: सुव्रत जोशीचा पहिला हिंदी चित्रपट.. या लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्यासोबत जमणार जोडी

Vidyut Jammwal's IB 71 Teaser Out: सुव्रतने त्याच्या सोशल मीडियावर एका चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

Pooja Dange

Suvrat Joshi First Hindi Movie: अभिनेता सुव्रत जोशी 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून आपल्या भेटीला आला. त्यानंतर सुव्रतने काही नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या पैठणी या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर सुव्रतचे 'अमर फोटो स्टुडिओ' हे नाटक देखील सुरु आहे. सुव्रत आपल्याला बॉलिवूड चित्रपट दिसणार आहे. याची माहिती सुव्रतने स्वतः दिली आहे.

सुव्रतने त्याच्या सोशल मीडियावर एका चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. आयबी 71तर असे या चित्रपटाचे नाव आहे. गाझी हल्ल्यावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सुव्रत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

सुव्रतने त्याच्या पोस्टमध्ये या चित्रपटाविषयी माहिती दिली आहे. सुव्रतने लिहिले आहे, 'हिंदी फिचर फिल्ममध्ये माझी पहिलीच भूमिका! टॉप सिक्रेट इज आऊट भारताचे सर्वात गोपनीय मिशन ज्यामुळे आपण 1971 चे युद्ध जिंकले. सादर करत आहे #IB7 12 मे 23 रोजी रिलीज होत आहे.'

आयबी 71 चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये तुम्ही सुव्रतची झलक पाहू शकता. यावरून आपण निष्कर्ष लावू शक्ती की सुव्रत चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

टीझरची सुरुवात सैन्यातील अधिकाऱ्यांच्या भेटीने होते. त्यानंतर अनुपम खेर यांचा बॅकग्राऊंड व्हॉइस येतो, तू जे सांगत आहेस ते बोलायला सोपे आहे पण एक्सिक्युट करणे कठीण आहे. हे वाक्य संपताना विद्युत जामवाल आणि अनुपम खेर एकमेकांच्या समोर येतात. त्यानंतर सुव्रत आणि विद्युत एका पुलावर चालताना दिसत आहे. तर बॅकग्राउंडला सुव्रतच व्हॉइस आहे, हे भारतातील पाहिलं ऑपरेशन असेल.

टीझरमध्ये तुम्हाला चित्रपटही सिरिअसने जाणवेल. कलाकारांचा संभाषण, दाखविण्यात आलेले सीन 71 च्या काळात घेऊन जातात.

विद्युत जामवाल याने चित्रातच टीझर त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर त्याच्या या पोस्टवर सुव्रत जोशीने कमेंट केली आहे, 'आला रे आला टीझर आला'. हा चित्रपट १२ मे. २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हॉस्टेलमधील मुलींना नेत्यांकडे पाठवलं जातं, खासदाराच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: बारामती पोटनिवडणुकीसाठी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान

How To Store Rava : रव्याच्या डब्यात ठेवा 'हा' एक मसाला; कीड आणि अळ्या लागणार नाही, रवा राहील एकदम फ्रेश!

Success Story: १.५ गुणांनी संधी हुकली, पण हार मानली नाही; पुढच्याच प्रयत्नात समर्थ राकलेंनी क्लास-१ अधिकारी होऊनच दाखवलं

Deepika Padukone: स्पिरिट, कल्किनंतर आता तिसऱ्या चित्रपटातून दीपिकाचा पत्ता कट? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT