Kanguva Teaser You Tube
मनोरंजन बातम्या

Kanguva Teaser: युद्ध अन् रक्त..; ‘कंगुवा’चा टीझर पाहून उडेल थरकाप

Kanguva Teaser Realesed: 'कांगुवा' या चित्रपटातील सूर्या आणि बॉबी देओलची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. नुकत्याच रिलीझ झालेल्या क्लिपमध्ये बॉबीचा जबदरस्त लूक पाहायला मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kanguva Teaser Out:

साऊथ सुपरस्टार सूर्या आणि बॉबी देओल यांचा 'कांगुवा' या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आलाय. हा टीझर पाहून अनेकांचा थरकाप उडालाय. या टीझरमध्ये बॉबी देओलचा लूक पाहून तुम्ही एनिमल चित्रपट विसरून जाल. प्रदर्शित झालेला व्हिडिओ फक्त ५१ सेकंदाचा आहे, परंतु या या व्हिडिओमध्ये सूर्या आणि बॉबी देओलच्या लूकने अनेकांना भूरळ घातलीय. या टीझरमध्ये बॉबी देओलला ३४ सेकंद दाखवण्यात आहे. या कालावधीत बॉबी आपली दमदार छाप सोडलीय. (Latest News)

या टीझरमध्ये युद्ध होताना दिसत आहे. समुद्र, जंगल सर्वत्र युद्ध होत आहेत. हा टीझर पाहिल्यानंतर अनेकांची झोप उडेल यात शंका आहे. टीझरमधील पार्श्वसंगीत देखील लोकांना प्रभावित करत आहे. सूर्याच्या वाढदिवशी या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. हा एक पॅन इंडिया चित्रपट असल्याचे सांगितलं जात आहे. जे जगभरातील १० भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहे.

हा चित्रपट ३५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलाय. कंगुवा या चित्रपटात बॉबी देओल उधिरन नावाच्या व्हिलेनची भूमिका बजावत आहे. या चित्रपटाद्वारे तो साऊथमध्ये पदार्पण करत असून सूर्यासोबत त्याचा हा पहिला चित्रपट आहे.

या चित्रपटात सूर्या बॉबी देओलशिवाय दिशा पटानी देखील मुख्य भूमिका आहे. चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे, यावरून प्रेक्षक या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक असल्याचे स्पष्ट झालं आहे. 'अनिमल' नंतर बॉबीची खलनायकी भूमिका पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक पुन्हा एकदा उत्सुक आहेत. काही दिवसापूर्वी निर्मात्यांनी बॉबीचा लूक रिलीज केला होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT