Suraj Chavan Video  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan Video : विजयानंतर सूरजची गावात ग्रँड एन्ट्री, गुलालाची उधळण अन् चाहत्यांची तौबा गर्दी पाहून भलतचं घडलं; Video पाहा

Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan: सूरज आता त्याच्या गावी पोहोचला आहे. सूरज गावी पोहचताच गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे. सूरजच्या विजयानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.विजयी होताच सूरजने सिद्धीविनायक गणपत्ती बाप्पा आणि जेजूरीत खंडोबाचं दर्शन घेतलं आहे. सूरज आता त्याच्या गावी पोहोचला आहे. सूरज गावी पोहचताच गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

सूरज मुळचा बारामतीतील मोढवे गावचा आहे. बिग बॉसचा विजेता सूरज झाल्यानंतर गावकऱ्यांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला होता. सूरजच्या कुटुंबियानी देखील आनंद झाला होता. नुकताच सूरज बिग बॉसचा शो झाल्यानंतर काल मंगळवारी त्याच्या गावी पोहचला. सूरजचे गावकऱ्यांनी स्वागत केले. गुलालाची उधळण करून सूरजची विजयी मिरवणूक काढली.

सूरजने गावी पोहचल्यानंतर सर्वप्रथम त्यांच्या शाळेला भेट दिली. शाळेतील विद्यार्थांना त्याने शिका आणि मोठे व्हा असे आवाहन केले. दरम्यान सूरजने त्याच्या मित्रमंडळी, गावकऱ्यासोबत फोटो काढत आनंद साजरा केला. मात्र याचदरम्यान सूरजला चक्कर आली. सूरजला चक्कर आल्याने सर्वजण घाबरले. यानंतर गर्दी कमी करून त्याला एका ठिकाणी शांत बसवण्यात आले. यादरम्यानचा सूरजचा व्हिडीओ समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT