Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : झापुक झुपुक म्हणतं गुलीगत बांधणार 'बिग बॉस'चं घर, ट्रॉफी उचलण्याचा निर्धार पक्का

Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी' चा खेळ शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपला आहे. अशात सूरज चव्हाण याने आपले मोठे सिक्रेट चाहत्यांना सांगितले आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी' चा (Bigg Boss Marathi) ग्रँड फिनाले काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र बिग बॉसची चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे. यंदाचा सीझन महाराष्ट्रात खूप गाजला. वेगवेगळ्या भागातील स्पर्धक यामध्ये पाहायला मिळाले. या सीझनला मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर देखील सहभागी झाले. संपूर्ण घरात आपले गुलीगत पॅटन निमार्ण करणाऱ्या सूरजने तर खूप कमी वेळात प्रेक्षकांची मने जिंकली. भरपूर प्रेम मिळवलं आहे.

बिग बॉसच्या ग्रँड सेलिब्रेशनमध्ये आपला प्रवास पाहून सूरजचे डोळे पाणावले. ज्या शो ला त्यांने सुरुवातीला नकार दिला होता त्याच शोने त्याला भरपूर प्रेम, मान सन्मान मिळवून दिला. त्याला एक नवी ओखळ दिली. बिग बॉसची ऑफर सुरुवातीला सूरजने नाकारली होती. गावाकडेचा पोरगा खूप फेमस झाला.

ग्रँड सेलिब्रेशनच्या वेळी सूरजने मोठे घोषणा केली. आपल्या प्रवासाचा व्हिडीओ पाहून सूरज (Suraj Chavan) भावुक झाला आणि म्हणाला की, "मला हा बिग बॉसचा प्रवास खूप भारी वाटला. हा शो संपल्यावर मी घर बांधणार आणि त्याला 'बिग बॉस' असं नाव देणार." तसेच त पुढे म्हणाला की, "मी ट्रॉफी नक्की जिंकणार..." सूरजकडे स्वतःचे घर नाही.

संपूर्ण प्रवासात सूरज नेहमी प्रामाणिकपणे वागला. सूरजला पॅडी दादा, अंकिता, डीपी दादा आणि अभिजीतने कायम साथ दिली. सूरज कायमच आपल्या आई-बापाचा आदर करताना पाहायला मिळाला. बिग बॉसच्या घरात त्याचे शब्द होते की, "आई-बाप असेल, तर जीवन आहे नाहीतर काहीच नाही" आता 6 ऑक्टोबर 'बिग बॉस मराठी 5' ची ट्रॉफी कोण उचलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी-खोकला होतो का? Should You Eat Curd During Monsoon

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

Eexcessive sleepiness: सतत झोप येतेय? या 7 धक्कादायक कारणांमुळे तुमचं शरीर देतंय मोठा इशारा

घटसर्प आणि धनुर्वातीची लस घेतली, १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू, नाशिकमध्ये वैदकीय क्षेत्रात खळबळ

Warehouse collapse: गोदामाचे छत कोसळून 9 जणांचा मृत्यू; 15 जण अजूनही मलब्याखाली

SCROLL FOR NEXT