Bigg Boss Winner Suraj Chavan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan: सूरज चव्हाणच्या विजेता ठरल्यानंतर सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाणसाठी खास पोस्ट केली आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस' मराठीचा पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आज पार पडला. सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. 'गुलिगत धोका' या नावाने बिग बॉस गाजवणाऱ्या सूरज चव्हाणला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सूरजने त्यांच्या विनोदीशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यानंतर पहिल्या दिवसांपासून सूरजने त्याच्या स्टाईलने प्रेक्षकांना याड लावलं. बिग बॉसमध्ये येण्याची संधी मिळाली आणि त्याने ७० दिवसांच्या प्रवासानंतर ट्रॉफीवर नाव कोरलं. सूरज चव्हाणच्या विजेता ठरल्यानंतर सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाणसाठी खास पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी, "कलर्स मराठी या वाहीनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ या रियॅलिटी शो मध्ये आपल्या बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण हा विजेता ठरला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सूरजने हे यश मिळविले. बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली. त्याचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन तथा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. सूरज आम्हाला तुझा अभिमान वाटतो"

अलिकडेच सुप्रिया सुळेनीं सूरज चव्हाणच्या विजयासाठी पोस्ट केली होती यामध्ये त्यांनी सूरज चव्हाणचा फोटो पोस्ट करत त्यांनी वोट दिलं होतं. पुढे त्यांनी आपल्या बारामती तालुक्यातील मोढवे गावचा सुपुत्र, प्रसिद्ध रिलस्टार सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालतोय. देशभर त्याची क्रेझ वाढली आहे. बिग बॉस सारख्या अवघड रिअॅलिटी शोमध्ये २७४ लोकांमधून अंतिम १६ मध्ये त्याची निवड झाली, ही आपल्या बारामतीसह अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. " अशी पोस्ट केली होती. सुप्रिया सुळे यांची सूरज चव्हाण विजेता होणार ही इच्छा पूर्ण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT