Sunny Leone Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sunny Leone Real Name : सनी लिओनीने तिचं मूळ नाव का बदललं? स्वतः च केला मोठा खुलासा

Sunny Leone Changed Her Name : सनी लिओनीचे खरे नाव सनी नसून दुसरेच काहीतरी आहे. जाणून घ्या काय आहे तिचे नाव.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sunny Leone Talks About Her Real Name : सनी लिओनी(Sunny Leone) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल आहे. सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्धी मिळवली आहे.पण सनीच्या नावाबाबत एक मोठा खुलासा तिने केला आहे. सनी लिओनीचे नाव सनी नसून दुसरेच काहीतरी आहे. जाणून घ्या काय आहे तिचे नाव.

सनी लिओनीने आपल्या करिअरची सुरवात मॉडेलींगपासून केली. सनी पहिल्यांदा बिग बॉस(Bigg Boss) मध्ये झळकली होती. बिग बॉसमुळेच सनी लिओनीला तिचा पहिला चित्रपट मिळाला.सनी लियोनी नेहमीच काही न काही कारणांमुळे चर्चेत असते. नुकतच सनीने तिच्या नावाबाबत मोठा खुलासा केला आहे.

सनी लिओनीचं खरं नाव करनजीत कौर वोहरा असे आहे. नुकतच एका मुलाखतीत तिचं नाव बदलण्यामागचे कारण सांगितले. सनी हे नाव तिचा भाऊ संदिप सिंह वोहराचे निक नाव आहे.सनीच्या आडनावाचीही एक गोष्ट आहे.

सनी लिओनीचा जन्म कॅनडामध्ये झाला आहे. एका सीख कुटुंबात सनी लिओनी जन्माला आली. काही वर्षांआधीच भारतात आली. एका मुलाखतीत सनी लिओनीने तिच्या लियोनी आडनावाबद्दल सांगितले.

एका मुलाखतीत,सनीने तिच्या नावाचा खुलासा केला. 'मी अमेरिकेत होती. एका मॅग्जीनचा इंटरव्ह्यू द्यायला गेली होती.तेव्हा त्यांनी मला स्वतःचे नाव काय ठेवायला आवडेल? असा पश्न विचारला. त्यावेळी मला काहीच सुचले नाही. मी एका टॅक्स आणि रिटार्यमेंट ऑफिसमध्ये काम करत होते. मी एचआर आणि अकाउंट डिपार्टमेंटमध्येही काम केले आहे.

मी एका ठिकाणी रिसेप्शनिस्टची नोकरीही केली आहे. दुसऱ्या ठिकाणी इंटरव्ह्यूला आली आहे. हे आधीच्या कामाच्या ठिकाणी कळले असते तर मी पकडली गेली असती. त्यामुळे मी त्यांनी सांगितले की, माझं नाव बदलून टाका. सनी हे नाव मी स्वतः सांगितले आणि आडनाव त्यांनाच निवडायला सांगितले'.असे सनी लिओनीने सांगितले.

सनीने नावाबद्दल सांगितले की,'सनी हे माझ्या भावाचे निक नाव आहे.त्याचं नाव संदिप सिंह आहे, माझ्या आईला मात्र मी हे नाव ठेवल्याचे आजिबात आवडले नाही. माझी आई म्हणाली की, तुला दुसरे कोणते नाव नाही सापडले काय? त्यावर मी बोलली, माझ्या डोक्यात सर्वात आधी हेच नाव आलं. मॅग्जीनसाठी निवडलेलं शेवटचं नाव मी तसंच ठेवलं'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

SCROLL FOR NEXT