Sunny Deol  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sunny Deol: एका मुलीमुळं सनी देओल मार खाता खाता वाचला; काय होता तो नेमका किस्सा?

Sunny Deol Interview : सनी देओलने नुकताच त्याच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sunny Deol Podcast

बॉलिवूडचा जबरदस्त आवाज आणि अॅक्शनमुळे प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे सनी देओल. सनी देओल त्याच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असतो. सनी देओल आता एका नवीन कारणाने चर्चेत आला आहे. सनी देओलने नुकताच त्याच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे.

सनी देओलचा 'गदर २' चित्रपट चांगलाच गाजतोय. चित्रपटाने आतापर्यंत ६०० कोटींच्या घरात कमाई केली आहे. सनी देओलने नुकतीच 'द रणवीर शो' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यात सनीनं एक किस्सा सांगितला. कॉलेजमध्ये असताना त्याने एका मुलीची छेड काढली होती. म्हणजेच तिला काहीतरी बोलला होता. छेड काढल्यानंतर तिचा भाऊ पाठलाग करत त्याच्या घरी पोहोचला, अशी हटके प्रसंगाची आठवण त्यानं सांगितली.

'शाळेत किंवा कॉलेजमध्ये कोणती नवीन मुलगी आली की आम्ही तिची छेड काढायचो. छेड काढायचो म्हणजे तिला काहीतरी बोलायचो. त्यावेळी आम्ही असेच वाहनातून जात होतो. तेव्हा एक सुंदर मुलगी आम्हाला दिसली. तेव्हा मी तिला काहीतरी बोललो असेन. त्यानंतर तिचा भाऊ आमचा पाठलाग करत घरापर्यंत पोहचला.

आम्हाला माहीतही नव्हतं की, त्या मुलीला भाऊ आहे. हा सर्व प्रकार पाहून माझे बॉडिगार्डही खाली आले. त्यावेळी मी माझी चूक मान्य केली. त्या मुलीच्या भावाला सांगितले की, मी चूक केली आहे. त्यामुळे तुला मला मारायचे असेल तर खुशाल मार. मी माझी चूक नेहमीच मान्य करतो. मी असाच आहे', असं सनी देओलनं सांगितलं. याच स्वभावामुळे चाहते त्याच्यावर खूप प्रेम करतात.

सनी देओलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, त्याचा 'गदर २' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. आतापर्यंत या चित्रपटानं तगडी कमाई केली आहे. 'गदर २' चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन पाठवण्याचीही मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Fort : गर्दीपासून दूर, सह्याद्रीच्या कुशीत! नाशिकमधील ७ ऑफबीट किल्ल्यांवर दिवाळीत भटकंती करा

Maharashtra News Live Update: पुण्याच्या मुळशी तालुक्यातील कोंढावळे येथील हॉटेलमध्ये तोडफोड

Maharashtra Politics: भाजपची मोठी खेळी! शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने समर्थकांसह हाती घेतलं 'कमळ'

Morning Breakfast Recipe: नाश्त्याला दररोज मोड आलेले कडधान्ये खाल्ले तर शरीराला काय फायदा होतो?

Weather Update : पाऊस थैमान घालणार! पुढील ८ तास महत्त्वाचे; १३ राज्यांना अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT