Jaat Trailer Release SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jaat Trailer Release : रणदीप हुड्डाचा थरार अन् सनी देओलचा ढाई किलो का हात, 'जाट' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात?

Sunny Deol - Randeep Hooda Movie : बॉलिवूडचे अभिनेते सनी देओल आणि रणदीप हुड्डाचा 'जाट' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता सनी देओल(Sunny Deol) सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'जाट'मुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात सनी देओलसोबत रणदीप हुड्डा (Randeep Hooda) देखील दमदार भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नुकताच 'जाट' (Jaat Trailer Release) चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पाहून चाहत्यांची चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता वाढली आहे.

'जाट'च्या ट्रेलरमध्ये सनी देओल आणि रणदीप हुड्डा थरार अनुभवायला मिळत आहे. 'जाट' चित्रपटातील डायलॉगला चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे. ट्रेलरमधील सनी देओलच्या एका डायलॉग ने लक्ष वेधून घेतले आहे. सनी देओल म्हणतो, की, "ये ढाई किलो की हात की ताकद पूरा नॉर्थ देख चुका है अब साऊथ देखेगा" 'जाट' हा ॲक्शन चित्रपट आहे.

'जाट' चित्रपटात मराठी प्रसिद्ध अभिनेता उपेंद्र लिमये देखील पाहायला मिळणार आहे. त्याने देखील चित्रपटात दमदार अभिनय केल्याचे पाहायला मिळत आहे. 'जाट' चित्रपटाचे दिग्दर्शन गोपीचंद मालीनेनी यांनी केले आहे. 'जाट' चित्रपट 10 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. सनी देओलच्या 'गदर 2'ला जसे प्रेम आणि प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद 'जाट' चित्रपटाला मिळेल असे दिसून येत आहे.

चित्रपटातील रणदीप हुड्डा 'रणतुंगा' या भूमिकेत दिसणार आहे. रणदीप हुड्डा खलनायकाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच चित्रपटात विनीत कुमार सिंह, सैयामी खेर आणि रेजिना कैसेंड्रा महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. चित्रपटातील अॅक्शन दृश्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Schedule : आयपीएल वेळापत्रक जाहीर, या तारखेला पहिला सामना; कोणत्या तारखेला कोण भिडणार? वाचा

Maharashtra Live News Update: विजय सूर्यवंशी यांची पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त पदी नियुक्ती

LPG Cylinder: इराण-अमेरिकेच्या युद्धानं गॅसची टंचाई, उद्योग ठप्प, हॉटेल बंद...; राज्यभरातील परिस्थिती काय, जाणून घ्या?

Sulochana Chavan: सोळावं वरीस धोक्याचं....अजरामर लावण्यांचा स्वरोत्सव रंगणार, कधी आणि कुठे?

प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नानंतर अवघ्या ४ वर्षांनी झाले वेगेळे

SCROLL FOR NEXT