Sunny Deol Get Angry Saam TV
मनोरंजन बातम्या

Sunny Deol Gets Angry : सेल्फी घेणाऱ्या फॅनवर संतापला सनी देओल; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Gadar 2 : सनी देओलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Pooja Dange

Sunny Deol Gets Angry On Fan:

बॉलिवूड अभिनेता सानी देओल सध्या त्याच्या 'गदर २' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट काल म्हणजे ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे, तसेच सेलिब्रिटी आणि बिजनेसमॅन देखील सनी देओलला त्याच्या या चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.

दरम्यान सनी देओलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एअरपोर्टवरील या व्हिडीओमध्ये नी देओल एका फॅनवर ओरडताना दिसत आहे. सनी देओलचे हे रूप पाहून नेटकरी चकित झाले आहेत. त्याचा संताप पाहून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये सनी देओल सर्व बाजूंना त्याचे बॉडीगार्ड होते. तर एक फॅन त्या बॉडीगार्डच्या ताफ्यातून देखील सनी देओलसोबत सेल्फी घेण्यासाठी धावत आला. सनी देओलच्या सुरक्षा रक्षकांनी त्या फॅनला थांबविण्याचा प्रयत्न केला. तरीही फॅन अभिनेत्याचा फोटो घेण्यासाठी धडपडत राहिला. तो फोटो घेत असताना सनी देओल ओरडला 'कधी ना फोटो.'

सनी देओलच्या या व्हिडिओवर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. नेहमी शांत आणि संयमी दिसणार सनी देओल असा कसा रिऍक्ट झाला यावर कोणाचा विश्वास बसत नाहीये.

या व्हिडीओवर कमेंट करत एका यूजरने लिहिले की, 'आम्ही तुमचा आदर करतो सर, पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर आलात तर चांगले होणार नाही.' दुसर्‍याने कमेंट केली, 'खूप उद्धट... निदान तुम्हाला कोणीतरी ओळखलं याचा आनंद व्हायला हवा.' तर अनेकजण असे म्हणत आहेत की, 'जनता आहे म्हणून तुम्ही आहात, तुम्ही असं वागू शकत नाही.' (Latest Entertainment News)

२२ वर्षेनंतर 'गदर एक प्रेमकथा' चित्रपटाचं सिक्वेल 'गदर २' प्रदर्शित झाला आहे. अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, मनीष वाढवा आणि सिमरत कौर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT