Sunny Deol Dance Video Instagram @iamsunnydeol
मनोरंजन बातम्या

Sunny Deol Dance Video: मुलाच्या लग्नात सनी देओलला आवरला नाही नाचण्याचा मोह; व्हिडिओ व्हायरल

Sunny Deol Dance: करणच्या संगीत सोहळ्यातील वडील सनी देओल यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Pooja Dange

Karan Deol Pre-Wedding Functions : सनी देओल आणि त्याचे कुटुंबात सध्या आनंद आणि चैतन्याचे वातावरण आहे. एकीकडे सनी देओल लवकरच 'गदर-2'मधून पुन्हा पडद्यावर धमाकेदार एन्ट्री करणार आहे. तर दुसरीकडे सनी देओलच्या मुलगा करण देओल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

काही महिन्यांपूर्वी चर्चा होती की, करण देओल त्याची गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत लग्नगाठ बांधणार आहे. आता करणचे प्री-वेडिंग फंक्शन्स मुंबईत सुरू झाले आहेत. ज्याचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. (Latest Entertainment News)

आता नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओ डान्सपासून नेहमी दूर राहणारा सनी देओल मनापासून नाचताना दिसत आहे.

काल रात्री संगीत सोहळ्यादरम्यान वडील सनी देओल, काका बॉबी देओल आणि अभय देओल यांनी पापाराझींना छान पोज दिल्या. तिघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता आणि आता करणच्या संगीत सोहळ्यातील वडील सनी देओल यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये सुरुवातीला सनी देओल त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीसोबत उभा असल्याचे दिसत आहे. पण संगीत सेरेमनीमध्ये त्याच्या जवळच्या लोकांची एनर्जी पाहून सनी देओलही स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने 'आज फिर कित्ते' या पंजाबी गाण्यावर डान्स केला आहे.

फंक्शनमध्ये सनी देओलने ब्लॅक शर्ट आणि गडद निळ्या जीन्समध्ये दिसत आहे. मिड डे दिलेल्या रिपोर्टनुसार, करण देओलची पार्टनर दृशा आचार्य दुबईची आहे आणि ती फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित नाही.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, करण-दृशाची एंगेजमेंट धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला झाली होती, ज्यामध्ये फक्त त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT