Sunita Ahuja Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sunita Ahuja: न गोविंदा, न मुलं… सुनीता आहूजाने एकटीनेचं केलं गणरायाचं स्वागत; डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Sunita Ahuja: सुनीता आहुजाने गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले. ढोलच्या तालावर नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. पण, गोविंदाच्या अनुपस्थितीवर नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Shruti Vilas Kadam

Sunita Ahuja: देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असून अनेक सेलिब्रिटींच्या घरीही गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिनेही गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी, रविवारी आपल्या घरी गणपती बाप्पाचे स्वागत केले. यावेळी सुनीता ढोल ताशाच्या तालावर उत्साहाने नाचताना दिसली. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये गणपतीची मूर्ती दुसरी व्यक्ती घेऊन जाताना दिसत आहे, तर सुनीता आहुजा ढोलच्या तालावर मनसोक्त नाचताना दिसते. घराच्या पायऱ्या चढतानाही तिचा उत्साह कायम असल्याचे पाहायला मिळते. मात्र, या व्हिडिओमध्ये गोविंदा किंवा त्यांची मुलं दिसत नसल्याने नेटकऱ्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

‘गोविंदा कुठे आहे?’

सुनीताच्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत, “तुम्ही इथे एकट्या का आहात? गोविंदा कुठे आहे?”, “तुमची मुलं कुठे आहेत?” असे प्रश्न विचारले. त्यामुळे गोविंदा यंदाच्या गणेशोत्सवात सुनीतासोबत सहभागी होणार की नाही? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यात मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र, सुनीताने या चर्चांना फेटाळून लावत त्यांच्या नात्यात सर्व काही ठीक असल्याचे स्पष्ट केले होते. “आम्हाला कोणीही वेगळे करू शकत नाही,” असेही तिने म्हटले होते. पण, अलीकडच्या काळात पुन्हा एकदा या जोडप्याच्या वैवाहिक आयुष्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सुनीताने गोविंदाचे अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारसोबत संबंध असल्याचा आरोप केल्याचे वृत्त समोर आले होते. काही आठवड्यांपूर्वी गोविंदा विमानतळावर कोमलसोबत दिसल्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आले.

यानंतर सुनीताने पापाराझींशी बोलताना कोमलवर टीका केली होती. तिने गोविंदाला ‘शुगर डॅडी’ ही म्हटले होते. आता गणपती बाप्पाच्या आगमनावेळी सुनीता एकटीच दिसल्याने पुन्हा एकदा त्यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer : जबड्याजवळ वेदना न होणारी गाठ? दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांनी सांगितली पॅरोटिड ट्यूमरची 7 लक्षणं

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये भाईगिरीचा प्रताप! हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटीची तोडफोड

Lavangache Pani: रात्री झोपण्यापूर्वी प्या लवंगाचे पाणी, फक्त १५ दिवसांत दिसेल रिझल्ट

गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या नाराजीनं वाढलं टेन्शन

Co-Ord Sets For Women: महिलांसाठी को-ऑर्ड सेटचे 5 लेटेस्ट पॅटर्न्स, जे अत्यंत स्टायलिश आणि कम्फर्टेबल

SCROLL FOR NEXT