Suhasini Mulay Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suhasini Mulay: सोशल मीडियावरून जुळल्या मनाच्या तारा; ६०व्या वर्षी प्रेमात पडली अभिनेत्री, अवघ्या ७५ दिवसांत बांधली लग्नगाठ

Suhasini Mulay: अभिनेत्री सुहासिनी मुळ्येंनी ६० व्या वर्षी लग्न केलं. ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळे यांची लव्ह स्टोरी अतिशय रंजक आणि प्रेरणादायी आहे.

Shruti Vilas Kadam

Suhasini Mulay: प्रेमाला कसलेच बंधन नसते असे म्हणतात. त्याचे एक उत्तम उदाहरण आहेत त्या म्हणजे सध्या चर्चेत असणाऱ्या मराठमोळ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळे. त्यांची लव्हस्टोरी ही बॉलीवूडच्या प्रेमकथांसारखीच रंजक आणि आश्चर्यचकीत करणारी आहे. कारण वयाच्या ६० व्या वर्षी त्यांच्या आयुष्यात त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली.

ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी वयाच्या ६० व्या वर्षी घेतलेल्या लग्नाच्या निर्णयाबाबत नुकताच मोठा खुलासा केला आहे. सफर सुहाना पॉडकास्टमध्ये त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, लग्नाबाबद आणि विशेष म्हणजे मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यांच्या या वक्तव्यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

एका सहकलाकाराच्या सल्ल्यानुसार सुहासिनी मुळे यांनी कामाच्या शोधात फेसबुकवर आपले अकाऊंट उघडले होते. तिथे स्क्रोल करत असताना त्यांची नजर अतुल गुर्टू यांच्या प्रोफाइलवर पडली, जे एक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ (सायंटिस्ट) होते.

पहिला मेसेज आणि मैत्री

अतुल गुर्टू 'लार्ज हॅड्रॉन कोलायडर' (LHC) या महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत होते. विज्ञानात रस असल्याने, सुहासिनी यांनी कुतूहलाने त्यांना "LHC काय आहे?" असा मेसेज पाठवला. या एका मेसेजमुळे त्यांच्या संवादाला सुरुवात झाली.

चौकशी आणि भेट

फेसबुकवर फेक अकाऊंटच्या भीतीमुळे, सुहासिनी यांनी त्यांच्या एका मैत्रिणीच्या मदतीने अतुल यांची पूर्ण माहिती काढून खात्री करून घेतली होती. त्यानंतर त्यांनी एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय घेतला. काही महिने चॅटिंग आणि भेटीगाठी झाल्यानंतर, त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

७५ दिवसांत लग्न

पहिल्या भेटीनंतर अवघ्या ७५ दिवसांतच या दोघांनी वयाच्या ६० व्या वर्षी लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला. जानेवारी २०११ मध्ये ते विवाहबद्ध झाले. त्यांनी वयाच्या साठीत लग्न करून हे सिद्ध केले की, प्रेम आणि योग्य जीवनसाथी शोधण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?

Rain Alert : राज्यात पाऊस थैमान घालणार, ३१ जिल्ह्यांना हाय अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?

Naivedya Thali : नैवेद्याची थाळी कशी सजवावी? 'या' सोप्या ६ टिप्स गृहिणींनी लक्षात ठेवाव्यात

Fact-Check: सरकारची E-30 ची तयारी?2030 पर्यंत E-30 वापरणार?व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

एसीबीची मोठी कारवाई, BMC च्या बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले, असा रचला सापळा

SCROLL FOR NEXT