Sudhir Phadke Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sudhir Phadke: संगीतकार सुधीर फडकेंना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार देण्याची केंद्र सरकारकडे मागणी

आपल्या सुमधुर स्वरांनी गीत रामायण अजरामर करणारे दिवंगत संगीतकार सुधीर फडकेंना मरणोत्तर 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र संगीत अध्यापक महामंडळाने भारत सरकारकडे केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sudhir Phadke: आपल्या सुमधुर स्वरांनी गीत रामायण (geet ramayan) अजरामर करणारे दिवंगत गायक - संगीतकार सुधीर फडके (sudhir phadke) यांना मरणोत्तर 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र संगीत अध्यापक महामंडळाने भारत सरकारकडे केली आहे. महाराष्ट्र संगीत अध्यापक महामंडळाची १ नोव्हेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत दिवंगत सुधीर फडके यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी भारत सरकारकडे करण्यात आली आहे.

सुधीर फडके यांनी जवळपास १ हजाराहून अधिक हिंदी चित्रपटांना संगीत दिले आहे. म्हणून त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. सुधीर फडकेंनी देशाच्या संगीताला वैभव प्राप्त करुन दिले आहे.

सुधीर फडके यांचे बाबुजी नाव देखील बरेच प्रचलित होते. बाबुजींनी देशातील १४ भाषांमध्ये संगीत रामायण भाषांतरित करुन लोकांपर्यंत पोहोचवले होते. तसेच महाराष्ट्र भूषण सुधीर फडकेंना देशातील ७४ मानाचे पुरस्कार विविध क्षेत्रातून प्राप्त झाले आहेत.

दिवंगत गायक संगीतकार सुधीर फडकेंना मरणोत्तर 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र संगीत अध्यापक महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष व जेष्ठ संगीत तज्ज्ञ डॉ. हरिभाऊ खंडारे यांनी केली आहे.

संगीत क्षेत्रातून देशातल्या लाडक्या संगीत प्रेमींना संगीत रामायण, अनेक चित्रपटांतील पार्श्वगायन, संगीत आणि संगीतरचना सुधीर फडके यांनी दिले आहे. त्यामुळे मी भारत सरकारला विनंती करतो की, फडके यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा, असे यावेळी मत जेष्ठ संगीत तज्ञ डॉ. हरिभाऊ खंडारे यांनी व्यक्त केले.

द्वारका पीठाचे श्री शंकराचार्य यांनी गीतरामायण एकूण सुधीर फडकेंचा म्हणजे बाबूजींचा 'स्वरश्री' ही पदवी देऊन गौरव केला होता. १ हजाराहून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटांना संगीतसुद्धा सुधीर फडके यांनी दिले. सुधीर फडके हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आकर्षक व्यक्तिमत्व होते, असे मत जेष्ठ संगीत तज्ज्ञ डॉ. हरिभाऊ खंडारे यांनी व्यक्त केले. सुधीर फडके यांनी भावगीते, भक्तिगीते, गीतरामायण, चित्रपट गीते, लावणी, अशी अनेक गाणी रसिक प्रेक्षांना दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

Shivsena Hearing: शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा सवाल, सुनावणीत नेमका काय युक्तिवाद झाला?

Medicine Short Form : औषधाच्या पाकिटावर लिहिलेल्या AC, OD, BD, TD, QID, SOS या शॉर्टफॉर्मचे अर्थ काय? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ

नागपूर-तुळजापूर महामार्गावर दोन कार धडकल्या; वृद्ध महिला ठार, मोकाट जनावरं अचानक आडवी आल्यानं घडला अनर्थ

SCROLL FOR NEXT