Subodh Bhave SAAM TV
मनोरंजन बातम्या

Subodh Bhave : "गणेशोत्सव म्हणजे फक्त डी जे नव्हे तर..."; सुबोध भावे यांच्या घरी वाजत गाजत गणरायाचे आगमन

Subodh Bhave Home Ganpati : मराठी अभिनेते सुबोध भावे यांच्या घरी गणपतीचे आगमन झाले आहे. त्यांनी गणेशोत्सवावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मराठी अभिनेता सुबोध भावे यांच्या घरी गणपतीचे आगमन झाले आहे.

सुबोध भावे सध्या 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.

सुबोध भावे यांच्या पुण्यातील घरी गणपती आला आहे.

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कलाकारांच्या घरी देखील आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन होत आहे. सर्वत्र आनंदाचे आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' ( Veen Doghatli Hi Tutena) मालिकेचे मुख्य कलाकार मराठी अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) यांच्या घरी गणपती बाप्पाचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले आहे. त्यांनी गणेशोत्सवावर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात.

सुबोध भावे यांच्या घरी गणपती आला आहे. सुबोध भावे यांच्या पुण्यातील घरी लाडक्या गणरायाचे स्वागत झाले आहे. भावे कुटुंबियांनी विधिवत पूजा करून बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली गेली. स्वतः सुबोध भावे आणि त्यांच्या मुलांनी बाप्पासाठी एक छोटा देखावा तयार केला आहे. दर वर्षी सुबोध भावे हे त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी गणेशोत्सव साजरा करतात.

सुबोध भावे यांची प्रतिक्रिया

बदलत्या गणेशोत्सवाच्याबाबत आणि वाढत्या डी जे च्या वापराबाबत सुबोध भावे यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. सुबोध भावे म्हणतात की, "गणेशोत्सव म्हणजे फक्त डी जे नव्हे तर तो एक वेगळाच उत्साह आहे..."

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका

मराठी अभिनेते सुबोध भावे यांची नुकतीच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्याच्या नवीन मालिकेचे नाव 'वीण दोघांतली ही तुटेना' असे आहे. मालिकेत त्यांच्यासोबत तेजश्री प्रधान झळकली आहे. प्रेक्षकांकडून या नवीन जोडीला खूप प्रेम मिळत आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळते.'वीण दोघांतली ही तुटेना' ही एक प्रेम कथा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT