Stree 2 Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Stree 2 Box Office Collection : १२ व्या दिवशी 'स्त्री २' ची बॉक्स ऑफिसवर घसरण, आतापर्यंतच्या कमाईचा आकडा किती?

Shraddha Kapoor And Rajkummar Rao Movie : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा स्त्री 2 चित्रपट रिलीज होऊन 12 दिवस पूर्ण झाले आहेत. या हॉरर कॉमेडी चित्रपटाने 11 दिवसांत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. आता या चित्रपटाचे सोमवारचे कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

स्त्री 2 च्या कथेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा कॉमेडी हॉरर चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. 15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

अमर कौशिकच्या स्त्री 2 ( Stree 2 ) हॉरर कॉमेडी चित्रपटाने 76.5 कोटीची कमाईने सुरुवात केली. पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. तर 11 दिवसांतच देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 400 कोटी रुपयांचा टप्पा पार केला. आता चित्रपटाच्या दुसऱ्या सोमवारचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात.

सोमवार - स्त्री 2 कलेक्शन

रविवारी, स्त्री 2 ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एका दिवसात सुमारे 40 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. सोमवारी अनेकांना जन्माष्टमीची सुट्टी होती, त्यामुळे सोमवारीही (Monday) चित्रपटाचा व्यवसाय चांगला होईल असा अंदाज बांधला जात होता, मात्र तसे झाले नाही. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव ( Rajkummar Rao ) यांच्या स्त्री 2चे सोमवारचे कलेक्शनमध्ये रविवारच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, स्त्री 2 या हॉरर कॉमेडी चित्रपटाने सोमवारी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर केवळ 17 कोटींचा व्यवसाय केला आहे. सोमवारी हा चित्रपट आपली जादू दाखवण्यात कमी पडला. जन्माष्टमीमुळे चित्रपटाच्या संध्याकाळच्या शोवर मोठा परिणाम झालेला पाहायला मिळाला.

स्त्री 2 ची जगभरातील कमाई

श्रद्धा कपूर ( Shraddha Kapoor )आणि राजकुमार राव यांच्या स्त्री 2 ने रविवारपर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे 402 कोटींची कमाई केली होती. 12व्या दिवसांनंतर Stree 2 चे एकूण कलेक्शन 419 च्या जवळ पोहोचले आहे. आता या चित्रपटाने 450 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची तयारी सुरू केली आहे. परदेशी बाजारातही या चित्रपटाने 85.5 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाची जगभरातील कमाई 560 कोटींवर पोहोचली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime : दबक्या पावलांनी घरात घुसले, लाखोंची सोन-चांदी लुबाडली; बीडमध्ये मध्यरात्री जबरी घरफोडी

लाडक्या बहि‍णींना २ लाख रुपये मिळणार; पहिला हप्ता २० हजारांचा असणार, जाणून घ्या अटी आणि पात्रता?

Maharashtra Live News Update: नरेश अरोरा यांचे बंधू उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

Pune : पुणे महानगरपालिकेत थरार, अधिकाऱ्याने टाळाटाळ केली, तरुणाने डोक्याला बंदूक लावली अन्...

Thane Ring Metro: रिंग मेट्रोमुळे ठाणेकरांचा प्रवास होणार सुलभ, २९किमी अंतरात असतील २२ स्थानकं; कुठे-कसा असणार मार्ग?

SCROLL FOR NEXT