Lagnanantar Hoilach Prem Marathi Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lagnanantar Hoilach Prem: घटस्फोटाची तयारी... नंदिनीचा धक्कादायक निर्णय; 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत नवा ट्विस्ट

Lagnanantar Hoilach Prem Marathi Serial: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सध्या प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करत आहे.

Shruti Vilas Kadam

Lagnanantar Hoilach Prem: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सध्या प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करत आहे. या मालिकेतील जीवा आणि नंदिनी यांच्या लग्नानंतर सुरू झालेल्या नात्यात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आता मालिकेत एक नवा आणि धक्कादायक वळण येणार आहे, ज्यामध्ये नंदिनी स्वतःहून जीवालाच घटस्फोट देण्यास तयार असल्याचं प्रोमोमधून स्पष्ट होतं.

नवीन प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की, नंदिनी जीवा आणि त्याच्या जुन्या मैत्रिणीमधील आठवणींच्या वस्तू पाहते आणि त्यातच एक भेटवस्तू तुटते. ही वस्तू पाहून जीवा प्रचंड चिडतो आणि नंदिनीवर जोरात ओरडतो. त्यावर नंदिनी भावनिक होऊन म्हणते, “जीवा तुम्ही फक्त सांगा… घटस्फोट द्यायला मी तयार आहे.” हा संवाद प्रेक्षकांच्या मनाला चटका लावणारा ठरतो आहे.

दुसरीकडे, काव्याने पार्थच्या प्रेरणेने पुन्हा अभ्यास सुरू केला आहे. ती स्पष्टपणे म्हणते की आता ती सगळं विसरून आपल्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणार आहे. काव्या आणि पार्थच्या नात्यातही नविन बदल घडताना दिसत आहेत.

या प्रोमोमुळे मालिकेच्या पुढील भागांबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नंदिनीचा निर्णय तात्पुरता आहे का? की ती खरोखरच जीवा सोडून जाणार आहे? जीवा काय उत्तर देणार? या सगळ्याची उत्तरं प्रेक्षकांना येणाऱ्या भागांमध्ये मिळणार आहेत. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचे हे नवीन वळण निश्चितच भावनिक, नाट्यमय आणि उत्कंठावर्धक ठरणार आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ७ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपासमोर ३ ते ४ किलोमीटरच्या रांगा

Mumbai : डोकं रिक्षावर आपटलं, फरफडत नेलं; ४ वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण, वसईचा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल!

भोंदू बाबा अशोक खरातवर शिर्डीत गुन्हा दाखल; 4 एकर भूखंड बळकावला|VIDEO

Dhurandhar 2 Collection : जगभरात 'धुरंधर 2'चा धुमाकूळ; 1,400 कोटींच्या उंबरठ्यावर, रणवीर सिंहने रचला इतिहास

Blood Pressure: ब्लड प्रेशर तपासताना या चूका करणं लगेचच थांबवा, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT