Saam tv  Google
मनोरंजन बातम्या

Comedian Neel Nanda Death: 32 वर्षीय स्टँडअप कॉमेडियनचा मृत्यू; काही दिवसांपूर्वी साजरा केला होता वाढदिवस, चाहत्यांना बसला मोठा धक्का

Comedian Neel Nanda Death: एंटरटेनमेंटच्या जगातील चमकत्या ताऱ्याने अकालीच जगाचा निरोप घेतला आहे. अवघ्या ३२ वर्षीय नील नंदा याचं निधन झालं आहे. त्याने वयाच्या ३२ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे.

Vishal Gangurde

Comedian Neel Nanda No More:

एंटरटेनमेंटच्या जगातील चमकत्या ताऱ्याने अकालीच जगाचा निरोप घेतला आहे. अवघ्या ३२ वर्षीय नील नंदा याचं निधन झालं आहे. त्याने वयाच्या ३२ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. नीलचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. नीलच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (Latest Marathi News)

नील नंदाचा मृत्यू कसा झाला?

नील भारतीय मूळचा भारतीय आहे. नील हा लॉस एन्जेलिसमध्ये राहायचा. नीलला लहानपणापासून कॉमेडी करण्याची आवड होती. यामुळे नीलने कॉमेडीमध्ये करिअर करायचं ठरवलं होतं. नीलच्या मॅनेजरने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मॅनेजर ग्रेगने गेल्या ११ वर्षापासून नीलसोबत काम करत होता. ग्रेग हा नीलला वयाच्या १९ व्या वर्षापासून ओळखायचा. नीलचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत त्याच्या कुटुंबाने मौन राखलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चाहत्यांना बसला मोठा धक्का

कॉमेडियन नीलच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नीलचे चाहते त्याच्या आठवणीत फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करू लागले आहेत. त्याचे चाहते सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहू लागले आहेत.

एका युजर्सने त्याचा शेवटचा कॉमेडी व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं की, 'नीलच्या वृत्ताने धक्का बसला आहे. कॉमेडी जगतातला सर्वात पॉझिटिव्ह व्यक्ती. त्याच्या मृत्यूने आमच्या समाजाचं नुकसान झालं आहे'.

नीलच्या मृत्यूने त्याचं कुटुंब आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे पालक भारतातून जॉर्जियात राहायला गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सरकारी नोकरी करत दिली UPSC; पाचव्या प्रयत्नात झाल्या IPS; मोहिता शर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Pune : पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार, रात्री ११ वाजता मावळ हादरलं, नेमकं काय घडलं?

Chhagan bhujbal : जीआरमध्ये मराठा जातीचा उल्लेख, निर्णय मागे घ्या; छगन भुजबळ आक्रमक

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT