Shreliala Replace Rashmika Mandanna Saam TV
मनोरंजन बातम्या

Shreeleela Replace Rashmika Mandanna : एकेकाळी रश्मिका मंदान्ना होती लकी चार्म, तिलाच प्रोजेक्टमधून हटवलं; आता तिची जागा घेणारी श्रीलीला कोण?

Who Is Sreeleela : श्रीलीला अनेक दिग्दर्शकांची नवीन आवडती अभिनेत्री ठरली आहे.

Pooja Dange

Sreeleela New Rising Star In Sauth : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सध्या स्टारडमचा पॉवर गेम सुरु आहे. दाक्षिणात्य चित्रपटांना मिळत असलेले यशामुळे इंडस्ट्रीतील कलाकार देखील यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत.

आता या स्टारडम लीगमध्ये अभिनेत्री श्रीलीलाची देखील भर पडताना दिसत हे. श्रीलीला अनेक दिग्दर्शकांची नवीन आवडती अभिनेत्री म्हणून उदयास येत आहे.

पूजा हेगडेची जागा घेतल्यानंतर, श्रीलीला आता रश्मिका मंदान्नाची जागा घेण्यास तयार आहे. रिपोर्ट्सनुसार, श्रीलीलाने वेंकी कुदुमुलाच्या पुढील चित्रपटात रश्मिका मंदान्नाची जागा घेतली आहे. (Latest Entertainment News)

रश्मिकाची जागा घेतल्यानंतर श्रीलीलाने गुंटूर करममध्ये पूजा हेगडेची देखील जागा घेतली आहे. पूजा आणि त्रिविक्रम यांचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे त्याच्या चित्रपटातून पूजाला बाहेर काढल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला.

पूजाची जागा घेण्यासाठी श्रीलीलाचा योग्य आहे, असाच काहीसा प्रकार वेंकी आणि रश्मिकासोबत घडला आहे. रश्मिकाला लकी चार्म मानणारा वेंकी देखील आता श्रीलीलाकडे वळला आहे.

रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर श्रीलीला रश्मिकाची जागा घेऊ शकते असे बोलले जात आहे. अनेक उत्तम कामगिरी गेल्यानंतर, तिचा स्टारडमचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे.

श्रीलीला दक्षिणेतल्या स्टारप्रमाणे उदयास येत आहे. जर वेंकीने त्याच्या लकी चार्मच्या रश्मिकाला घेण्याचा निर्णय घेतला, याचा अर्थ श्रीलीलाचे काम त्यांना किती आवडले असेल याची आपण कल्पना करू शकतो.

श्री इंडस्ट्रीची पहिली चॉईस बनत आहे कारण तिच्याकडे सध्या सात चित्रपट आहेत. 2023-2024 दरम्यान, श्रीलीला आदिकेसवा, स्कंद, भगवंत केसरी, नितिन 32, गुंटूर करम, VD12 आणि उस्ताद भगतसिंगमध्ये भूमिका साकारणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT