Spider Man Dubbed In Marathi : Saam TV
मनोरंजन बातम्या

Spider Man In Marathi: स्पायडरमॅन आता मराठीत! या मराठमोळ्या कलाकाराने सांभाळली चित्रपटाची धुरा

Spider Man New Movie: स्पायडरमॅनला एका मराठमोळ्या अभिनेत्याने आवाज दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Spider Man Dubbed In Marathi : स्पायडरमॅन या सुपरहिरोचे चाहते जगभर आहेत. स्पायडरमॅनची क्रेझ फक्त लहान मुलांमध्ये नाहीतर मोठ्यांमध्ये देखील पाहायला मिळते. स्पायरमॅन चित्रपटाचे अनेक भाग आजपर्यंत आपल्या भेटीला आले आहेत. ‘स्पायडरमॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ या नवीन चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातलं स्पायडरमॅनला एका मराठमोळ्या अभिनेत्याने आवाज दिला आहे.

‘स्पायडरमॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ भारतातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या भाषेत डब केला आहे. मराठी देखील डब करण्यात ‘स्पायडरमॅन’ हा चित्रपट आला गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. (Latest Entertainment News)

मराठी भाषेत डब झालेला स्पायडर मॅन हा पहिला चित्रपट आहे. मराठीत डब झालेल्या या हॉलीवूडपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक व अभिनेता असलेल्या सचिन सुरेश या मराठामोळ्या चेहऱ्याने सांभाळली आहे.

रेडिओ जॉकी, डबिंग या प्रवासात स्वतःला सिद्ध केल्यानंतर ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडरव्हर्स’ या अॅनिमेशनपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा एका मोठ्या हॉलीवूडपटाच्या प्रोजेक्टचा भाग होता आल्याचा आनंद सचिन सुरेश याने व्यक्त केला.

'प्राईम फोकस टेक्नॉलॉजी'ने माझ्यावर विश्वास दाखवत ही संधी मला दिली, माझ्यासाठी हा वेगळा आणि थ्रिलिंग अनुभव होता. डबिंग ते मिक्सिंग अशी सर्व जबाबदारी सांभाळत महिन्याभरात आम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण केल्याचे सचिन सांगतात.

‘स्पायडरमॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात विविध देशांतील ‘स्पायडरमॅन’चे अवतार पाहायला मिळत असून सोबत त्याच्या भारतीय अवताराची झलकही या चित्रपटात पाहायला मिळत आहे. (Movie)

पवित्र प्रभाकरने भारतीय स्पायडरमॅनच्या भूमिका साकारली असून त्याचा मराठमोळा आवाज पंकज खामकर याने डब केला आहे. ‘सोनी पिक्चर्स एन्टरटेन्मेट इंडिया’ निर्मित ‘स्पायडरमॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ हा चित्रपट २ जूनपासून चित्रपटगृहात सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अमेरिकेच्या दबावामुळे द्यावा लागला - शेतकरी नेते -राकेश टिकैत

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT