Main Atal Hoon Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Main Atal Hoon Movie: 'मैं अटल हूं' चित्रपटाचे विधीमंडळाच्या सभागृहात होणार स्पेशल स्क्रिनिंग

Maharashtra Government: आता या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग महाराष्ट्र विधीमंडळाच्या सभागृहामध्ये होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही माहिती दिली आहे.

Priya More

Main Atal Hoon Movie:

बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीचा (Pankaj Tripathi) बहुप्रतीक्षित 'मैं अटल हूं' हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटाला आला. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज त्यांची प्रतीक्षा संपली. हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान अटेलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे.

पंकज त्रिपाठी या चित्रपटामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत. आता या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग महाराष्ट्र विधीमंडळाच्या सभागृहामध्ये होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही माहिती दिली आहे.

राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित 'मै अटल हूं' चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे स्क्रिनिंग विधीमंडळ सभागृहात होणार आहे. सर्व आमदार आणि मंत्री यांना या चित्रपटासाठी आमंत्रित केले आहे. राजकीय जीवनातून समाजाचे प्रतिनिधित्व करणारे विचार यातून सध्याच्या समाजास हा चित्रपट मार्गदर्शक ठरणार आहे.'

देशाचे सर्वांचे लाडके नेते अटलबिहारी वाजपेयी, शिक्षण, विज्ञान, पायाभूत सुविधा आणि जागतिक संबंध मजबूत करण्यासाठी त्यांच्या योगदानासाठी प्रसिद्ध होते. या चित्रपटामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे बालपणीचे दिवस, राजकीय कारकीर्द, बदल घडवून आणण्यासाठी आणि भारताला एक महान राष्ट्र बनवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांच्या या चित्रपटात अनेक कलाकारांनी काम केले आहे. भानुशाली स्टुडिओज लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओजच्या पाठिंब्याने या चित्रपटाची पटकथा ऋषी विरमानी आणि रवी जाधव यांनी लिहिली आहे. तर सलीम-सुलेमान यांनी मनोज मुंतशिर यांच्या गीतांसह संगीत दिले आहे. या चित्रपटातील गाण्यांना देखील प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT