toxic movie pre release event hyderabad tragedy  AI Image
मनोरंजन बातम्या

Toxic Movie : सुपरस्टार अभिनेत्याच्या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटदरम्यान मोठी दुर्घटना, सेटअप अचानक कोसळला अन्...

Yash Toxic Pre Release Event Tragedy : साऊथ सुपरस्टार यशच्या ‘टॉक्सिक’च्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये साउंड सिस्टीम कोसळून दोन जण जखमी झाले. हैदराबादमधील या दुर्घटनेची संपूर्ण माहिती वाचा.

Alisha Khedekar

  • हैदराबादमध्ये साऊथ सुपरस्टार यशच्या ‘टॉक्सिक’च्या प्री-रिलीज इव्हेंटदरम्यान मोठी दुर्घटना

  • इव्हेंटदरम्यान साउंड सिस्टीमचा मोठा सेटअप कोसळला

  • दुर्घटनेत २ जण गंभीर जखमी

  • जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

साऊथ सुपरस्टार यशच्या बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक’ या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटदरम्यान हैदराबादमध्ये मोठी दुर्घटना घडली. मल्ला रेड्डी युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला हजारो चाहत्यांनी आणि विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. याचदरम्यान साउंड सिस्टीमचा मोठा सेटअप अचानक कोसळला. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने लोक स्टेजजवळ जमा झाले होते. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून वारंवार लोकांना मागे हटण्याचे आवाहन केले जात होते. मात्र, काही जण स्टेजच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. घटनास्थळावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण कार्यक्रमाच्या परिसरातील साउंड सिस्टीमवर चढताना दिसत आहेत. काही जण साउंड बॉक्सला आधार देणाऱ्या पोलवरही चढल्याचे दिसून येते. त्याचवेळी साउंड सिस्टमचा काही भाग अचानक खाली कोसळला आणि परिसरात एकच गोंधळ उडाला.

या वेळी अभिनेता यश मंचावर भाषण करत होता. दुर्घटनेची माहिती मिळताच त्याने तत्काळ आपले भाषण थांबवले आणि घटनास्थितीची माहिती घेतली. त्यानंतर यशने उपस्थित अधिकाऱ्यांना जखमींची तातडीने तपासणी करण्याची विनंती केली. जखमी दोन्ही व्यक्तींना त्वरित जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

आयोजकांकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळाल्यानंतर यशने पुन्हा आपले भाषण सुरू केले. दरम्यान, ‘टॉक्सिक’ हा यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट असून या सिनेमात नयनताराही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. गीतू मोहनदास यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट २६ ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : जेवल्यावर १ घोट पाणीही ठरू शकतं विषारी? डॉक्टरांनी दिला धक्कादायक इशारा

Maharashtra News Live Update: लातूर- लामजना पाटी येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

EV Charging : इलेक्ट्रिक गाड्यांचे चार्जिंग आता इमारतीतच; नव्या सोसायट्यांसाठी EV पॉईंट्स अनिवार्य होण्याची शक्यता

Bollywood Actress : "एका रात्रीसाठी काय घेणार?", प्रसिद्ध अभिनेत्रीकडे अश्लील मागणी

High BP - Weight Loss : सकाळची 'ही' १ साधी सवय हाय बीपी अन् वाढणारे वजन ठेवेल कंट्रोलमध्ये, आतापासून करा फॉलो

SCROLL FOR NEXT