Ram Charan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ram Charan अनवाणी पायाने एअरपोर्टवर स्पॉट, नेमकं कारण काय? पाहा VIDEO

Ram Charan Viral Video : दाक्षिणात्य अभिनेता राम चरण एअरपोर्टवर अनवाणी पायाने स्पॉट झाला आहे. या मागचे नेमकं कारण काय, जाणून घ्या.

Shreya Maskar

दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण (Ram Charan ) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. त्याचा अभिनय पाहून चाहते घायाळ होतात. राम चरणचा मोठा चाहता वर्ग आहे.

राम चरण 'गेम चेंजर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला. हा टीझर लाँचचा सोहळा लखनऊमध्ये पार पडला. 'गेम चेंजर' चित्रपटाच्या टीझर लाँचचा कार्यक्रम शनिवारी सकाळी पार पडला. तेव्हा हैदराबाद एअरपोर्टवर दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण यांना स्पॉट केले गेले. तेव्हा राम चरण अनवाणी दिसला. त्याच्या पायात चप्पल नव्हती. राम चरण यांचा अनवाणी पायाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

राम चरण एअरपोर्टवर काळ्या कपड्यांमध्ये स्पॉट झाला. तो गाडीतून उतरताना त्याच्या पायात चप्पल किंवा बूट काहीच नव्हते. मीडिया रिपोर्टनुसार, त्याच्या अनवाणी जाण्यामागचे कारण असे की, दक्षिणेत अयप्पा दीक्षा नावाची परंपरा आहे. यात ४१ दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचे असते. यात अनवाणी चालावे लागते. दरवर्षी राम चरण हे करतो.

'गेम चेंजर' चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहत्यांना या चित्रपटाची खूप जास्त उत्सुकता लागली आहे. अभिनेता राम चरणच्या अभिनयाने चाहते वेडे होतात. या चित्रपटाची पार्श्वभूमी राजकारण पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात राम चरणसोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'गेम चेंजर' चित्रपटात राम चरण आयएएस अधिकारी राम मदन यांची भूमिका साकारणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT