Prabhas Account Hack Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prabhas Account Hack: 'बाहुबली'ला धक्का! प्रभासचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक?; चाहते पडले बुचकळ्यात

Prabhas Instagram Account Hack: अभिनेत्याने स्वत:हून त्याचे इन्स्टा अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्हेट केले आहे की त्याचे खाते खरोखर हॅक झाले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Priya More

South Superstar Prabhas:

साऊथचा सुपरस्टार आणि 'बाहुबली' फेम अभिनेता प्रभास (south superstar prabhas) अडचणीत आला आहे. तसंच सोशल मीडियावर (Social Media) प्रभासला फॉलो करणाऱ्या त्याच्या चाहत्यांसाठी देखील धक्कादायक बातमी आहे.

प्रभासचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक (Prabhas Account Hack) झाले आहे. अभिनेत्याने स्वत:हून त्याचे इन्स्टा अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्हेट केले आहे की त्याचे खाते खरोखर हॅक झाले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या साऊथ सुपरस्टार प्रभासचे इन्स्टाग्राम अकाऊंट प्लॅटफॉर्मवर दिसत नाही. त्यामुळे सुपरस्टारचे अकाउंट हॅक झाले असावे असा अंदाज फॅन्स करत आहेत. त्याचबरोबर काहींना असा देखील प्रश्न पडला आहे की, प्रभासने स्वतःचे इन्स्टाग्राम अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट केले आहे का? पण नेमकं काय घडलं आहे हे अद्याप कळू शकले नाही.

सुपरस्टार प्रभासचे इन्स्टाग्राम अकाऊंट दिसत नसल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. चाहत्यांना समजत नाहीये की हे प्रकरण नेमकं काय आहे? यावर प्रभासकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अभिनेत्याच्या चाहत्यांच्या मनात दोनच प्रश्न आहेत की, प्रभासचे अकाउंट हॅक झाले आहे का? किंवा स्वत: प्रभासने त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट केले आहे.

प्रभासचे लाखो चाहते आहेत जे आपले आयुष्य अभिनेत्यासाठी समर्पित करतात. अशा परिस्थितीत समोर आलेल्या बातमीमुळे त्याचे चाहते निराश झाले आहेत. जर प्रभासने स्वतःच त्याचे अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट केले असेल तर नक्कीच चाहत्यांची मनं तुटतील. कारण हे असे व्यासपीठ आहे ज्याद्वारे चाहते त्यांच्या आवडत्या सुपरस्टारबद्दल अपडेट राहतात आणि वेळोवेळी चाहते प्रभासशी संपर्क देखील करतात. जोपर्यंत प्रभास स्वत:हून याबद्दल काही सांगत नाही तोपर्यंत खरं काय ते कळणार नाही.

प्रभासच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या प्रभास दिग्दर्शक मारुतीच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तो नाग अश्विनच्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आधी 'प्रोजेक्ट के' असे होते. प्रभासचे चाहते प्रशांत नीलच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'सालार : भाग 1 - सीझफायर' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट आता 22 डिसेंबर 2023 रोजी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या 'डिंकी'शी टक्कर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Noida Building Fire: ५ मजली इमारतीला भीषण आग, २ जणांचा मृत्यू; स्कूटी चार्ज करताना झालेल्या ब्लास्टमुळे घडली दुर्घटना

मोठी बातमी! माजी खासदार विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: संत सोपान काकांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा आज पार पडला

इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून तुफान चर्चा; नितीन गडकरींची बदनामी केल्याप्रकरणी ४ प्रसिद्ध एन्फ्ल्यूएन्सर कोण? कोणावर गुन्हा दाखल

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ₹१५०० जमा, जूनच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला आले का? लगेच अकाऊंट तपासा

SCROLL FOR NEXT