Captain Miller Saam Tv
मनोरंजन बातम्या

Captain Miller Trailer: 'कॅप्टन मिलर'चा धमाकेदार ट्रेलर आऊट, धनुषच्या खतरनाक लूकने वेधलं लक्ष

Captain Miller Movie: या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये धनुष एका अनोख्या अंदाजमध्ये दिसत आहे. धनुषचा नवीन आणि खतरनाक अवतार पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

Priya More

Dhanush Movie:

साऊथचा सुपरस्टार धनुषचा (South Superstar Dhanush) बहुप्रतिक्षित चित्रपट 'कॅप्टन मिलर'ची (Captain Miller Movie) प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटाच्या एकाएका अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये धनुष एका अनोख्या अंदाजमध्ये दिसत आहे. धनुषचा नवीन आणि खतरनाक अवतार पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 'कॅप्टन मिलर' चित्रपटाच्या ट्रेलरमधील (Captain Miller Trailer) धनुषच्या अॅक्शन अवताराचा सध्या सगळीकडे बोलबाला सुरू आहे. त्याच्या लूकचेही खूप कौतुक होत आहे.

'कॅप्टन मिलर'मधील धनुषच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मोठे केस आणि वाढलेली दाढी असलेला धनुषचा लूक त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडला. 2.54 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये धनुष ब्रिटिशांविरुद्ध एकटाच लढताना दिसत आहे. कधी तो शत्रूंवर गोळ्या झाडताना दिसतोय. तर कधी धारदार तलवारीने त्यांच्यावर हल्ला करताना दिसत आहे. ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की, तो एका गावाचे इंग्रजांपासून संरक्षण करत आहे आणि यादरम्यान तो स्वत:च्या जीवाची देखील परवा करत नाही.

'कॅप्टर मिलर'च्या ट्रेलरमध्ये धनुष एक डायलॉग म्हणतो की, 'तुम्ही सैतानबद्दल ऐकलेच असेल. मी तो सैतान आहे ज्याला लोक प्रेमाने कॅप्टन मिलर म्हणतात. यानंतर तो एकापाठोपाठ एक गोळ्या झाडू लागतो. ट्रेलरच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत धनुष केवळ अॅक्शन करताना दिसतो. 'कॅप्टन मिलर'चा ट्रेलर ज्या पद्धतीने तयार करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून धनुषच्या चाहत्यांच्या मनात चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

धनुषच्या 'कॅप्टन मिलर' चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण माथेश्वरन यांनी केले आहे. धनुषसोबत या चित्रपटामध्ये प्रियंका अरुल मोहन, शिवराज कुमार, निवेदिता सतीश, विनायकन आणि संदीप किशन हे स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच सेन्सॉर बोर्डाकडून U/A प्रमाणपत्र मिळाले आहे. हिंदी व्यतिरिक्त 'कॅप्टन मिलर' हा चित्रपट साऊथच्या भाषांमध्ये 12 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT