Dhanush-Nayanthara SAAM TV
मनोरंजन बातम्या

डॉक्युमेंटरीचा वाद सुरू असतानाच Dhanush अन् Nayanthara यांची एकाच सोहळ्याला हजेरी, 'तो' व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Dhanush-Nayanthara Viral Video: नुकतेच धनुष आणि नयनतारा एका लग्नसोहळ्यात आमनेसामने आले. नेमकं त्यावेळी काय घडलं जाणून घ्या.

Shreya Maskar

धनुष (Dhanush) आणि नयनतारा (Nayanthara ) हे दोन्ही साऊथचे मोठे सुपरस्टार आहेत. आपल्या अभिनयाने यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केल आहे. सध्या या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नयनतारा आणि धनुष एकमेकांना इग्नोर करताना पाहायला मिळत आहेत.

नयनतारा आणि धनुष सध्या डॉक्युमेंटरीच्या वादामुळे चर्चेत आहेत. नयनताराची डॉक्युमेंटरी 'नयनतारा: बियॉन्ड द फेअरी टेल'वरून हा वाद सुरू आहे. या वादानंतर नयनतारा आणि धनुष आता एका लग्नसोहळ्यात एकत्र स्पॉट झाले. म्हणजे या लग्नसोहळ्याला दोघांनीही उपस्थिती लावली होती. मात्र एकमेकांना ओळख न दाखवता त्यांनी एकमेकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा लग्नसोहळा निर्माता आकाश भास्करन यांचा होता. हा सोहळा गुरुवारी पार पडला.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नसोहळ्यात दोघही वेगवेगळ्या बाजूंना पहिल्या रांगेत बसलेले दिसत आहेत. तसेच एकमेकांकडे दुर्लक्ष करत आहेत. व्हिडीओमध्ये नयनतारा पाहुण्याशी गप्पा मारताना तर धनुष स्टेजकडे पाहताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'नानुम राऊडी धान' या चित्रपटाच्या तीन सेकंदांचा बिहाइंड द सीनमुळे हा वाद झाला.

नयनतारा या लग्नसोहळ्याला तिच्या नवऱ्यासोबत म्हणजे विग्नेश शिवनबरोबर आली होती. नयनतारा छान गुलाबी रंगाची साडी नेसली होती. नयनताराचे चाहते दिवाने आहेत. इंस्टाग्रामवरील तिच्या प्रत्येक फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्स करतात. चाहते यांच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

SCROLL FOR NEXT