Samantha Prabhu SAAM TV
मनोरंजन बातम्या

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Samantha Ruth Prabhu Talk On Motherhood: दाक्षिणात्य अभिनेत्रीने घटस्फोटाच्या तीन वर्षानंतर मातृत्वावर प्रतिक्रिया दिली आहे. समांथा रुथ प्रभू नेमकं काय बोली जाणून घ्या.

Shreya Maskar

समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनयाने मोठा चाहता वर्ग निमार्ण केला आहे. तिच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत.

समांथा नुकतीच वरुण धवनसोबत क्राईम-थ्रीवर सीटाडेल हनीबनी वेब सीरिजमध्ये झळकली. यात वरुण आणि समांथाची केमिस्ट्री पाहून चाहते वेडे झाले आहेत. प्रेक्षकांचा या सीरीजला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. समांथाने या नव्या सीरिजच्या प्रमोशन दरम्यान एक मोठा खुलासा केला आहे. तिने आपल्या आई होण्याबाबत भाष्य केलं आहे.

समांथाने मिडिया मुलाखतीत सांगितले की, "मला अजूनही आई व्हायचे आहे. मला नाही वाटत की उशीर झाला आहे. माझे अजूनही आई होण्याचे स्वप्न आहे. हा जगातला एक सुंदर अनुभव आहे आणि मी या अनुभवाची वाट पाहत आहे. लोक वयाची काळजी करतात, पण मला तसे वाटत नाही. आयुष्यात अशी वेळ नाही की तुम्ही आई होऊ शकत नाही."

समांथा आणि नागा चैतन्यचा (Naga Chaitanya) घटस्फोट होऊन आता तीन वर्ष झाली आहेत. 2021 मध्ये हे कपल विभक्त झाले. घटस्फोटाच्या दोन वर्षांनी अभिनेता नागा चैतन्यने शोभिता धुलिपालासोबत नातं जोडले आणि साखरपुडा केला.

समांथा रुथ प्रभूने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इंस्टाग्रामवर 36 मिलियन फॉलोवर्स आहेत. तिने आपल्या लूक्सने चाहत्यांना घायाळ केलं आहे. ती आपल्या नवीन प्रोजेक्टबद्दल नेहमी सोशल मीडियावर अपडेट करत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT