Rashmika Mandanna And Vijay Devarakonda Engagement Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rashmika And Vijay Engagement: विजय देवरकोंडा-रश्मिका मंदाना लवकरच लगीनगाठ बांधणार? 'या' दिवशी करणार साखरपुडा?

Rashmika And Vijay Engagement News: येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा साखरपुडा उरकरणार असल्याचं सांगितलं जातंय.

Chetan Bodke

Rashmika Mandanna And Vijay Devarakonda Engagement Update

अवघ्या देशाची नॅशनल क्रश म्हणून चर्चेत आलेली रश्मिका मंदान्ना सध्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिच्या आणि टॉलिवूड अभिनेता विजय देवरकोंडाच्या नात्याची चर्चा कायमच होत असते. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची चर्चा रंगलीय. येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये हे कपल साखरपुडा उरकरणार असल्याचं सांगितलं जातंय.

न्यूज १८ तेलुगूच्या रिपोर्टनुसार, रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा लवकरच साखरपुडा करणार आहेत. दोघेही फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच एंगेजमेंटची माहिती चाहत्यांना देणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर रश्मिका आणि विजयच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा सुरु आहे. आता त्यांच्या साखरपुड्याची माहिती मध्ये किती तथ्य आहे, याबद्दलची माहिती नेटकऱ्यांना येत्या काही दिवसातच मिळेल.

रश्मिका आणि विजयची पहिली भेट ‘गीता गोविंदम’ चित्रपटाच्या सेटवरच झाली होती. यानंतर रश्मिका आणि विजयने बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्रित कामही केलं आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, ऑनस्क्रीन हिट ठरलेली जोडी येत्या फेब्रुवारी महिन्यात एंगेज होणार आहेत. दोघंही अनेकदा काही कार्यक्रमांमध्ये एकत्रित स्पॉटही झाले आहेत. खरंच हे कपल साखरपुडा करणार का याबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सर्वात आधी विजयच्या कामाबद्दल सांगायचे तर, २०२३ या वर्षी विजयचा ‘खुशी’ चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री समांथा प्रभू प्रमुख भूमिकेत दिसली होती. येत्या काही दिवसातच विजयचा ‘फॅमिली स्टार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर रश्मिकाच्या कामाबद्दल सांगायचे तर, ‘पुष्पा’ला मिळालेल्या अभुतपूर्व यशानंतर अभिनेत्री ‘पुष्पा २’ चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ‘रेम्बो’ नावाच्या तेलुगू चित्रपटातही अभिनेत्री पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT