Trisha Krishnan-Mansoor Ali Khan Dispute Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mansoor Ali Khan-Trisha Krishnan Controversy: ‘मी तिच्या लग्नाला जाणार आणि...’ त्रिशाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मंसूरचा माफीनामा

Mansoor Ali Khan-Trisha Krishnan News: सहकलाकार आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल केलेल्या अश्लील वक्तव्याबद्दल मंसूरने माफी मागितली आहे.

Chetan Bodke

Trisha Krishnan-Mansoor Ali Khan Dispute

‘लिओ’ फेम तमिळ अभिनेता मन्सूर अली खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे त्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले. त्याने केलेल्या विधानामुळे त्याच्यावर गुन्हाही करण्यात आला. सहकलाकार आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल केलेल्या अश्लील वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आक्षेपार्ह विधानाबद्दल माफी मागताना मन्सूर अली खान म्हणाला, ‘माझी सहकलाकार त्रिशा कृपया मला माफ कर. मला तुझ्या लग्नामध्ये तुला आशीर्वाद देण्याची देव मला संधी देओ. आमीन’

अभिनेत्याने माफी मागितल्यानंतर त्रिशानेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर)वर प्रतिक्रिया दिली आहे. ‘फक्त मानवाकडूनच चुका होतात, क्षमा करणे गरजेचे आहे.’ 19 ऑक्टोबरला कलाकारांच्या संघटनेने, 'द साउथ इंडियन आर्टिस्ट असोसिएशन' (SIAA) ने त्रिशाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल अभिनेता मन्सूर विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला होता. सोबतच सर्वच स्तरातून जाहीर माफी मागण्याचीही मागणी केली होती.

मन्सूर अली खान यांनी त्यांच्या एका वक्तव्यात मी 'लिओ'चा एक भाग असताना सुद्धा त्रिशासोबत माझा कोणताही 'रेप' सीन नाही असे म्हटले होते. त्याने पुढे असे देखील सांगितले की,तिच्यासोबत 'बेडरूम सीन' करण्याची संधी मी गमावली. अभिनेत्याच्या या वक्तव्यानंतर गदारोळ झाला आणि त्रिशाने देखील अभिनेत्याला खडेबोल सुनावले. हा वाद वाढल्यानंतर आणि नदीगर संगमने मन्सूर अली खान यांच्यावर तात्पुरती बंदी घातली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

SCROLL FOR NEXT