Dr. Priya Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dr. Priya Death: टॉलिवूडला मोठा धक्का! प्रसिद्ध अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, ८ महिन्यांची होती गरोदर

Dr. Priya Died: ३५ वर्षीय अभिनेत्री प्रिया लवकरच आई होणार होती. ती आठ महिन्यांची गरोदर होती.

Priya More

South Film Industry:

प्रसिद्ध अभिनेत्री रंजुषा मेननच्या (Renjusha Menon) निधनाच्या धक्क्यातून सावरत नाही तोवर टॉलिवूडला (Tollywood) आणखी एक धक्का बसला आहे. आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन झालं आहे. मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीची (Malyalam Tv Industry) प्रसिद्ध अभिनेत्री डॉ. प्रियाचे निधन (Actress Dr. Priya Death) झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय अभिनेत्री प्रिया लवकरच आई होणार होती. ती आठ महिन्यांची गरोदर होती. नियमित आरोग्य तपासणीसाठी ती रुग्णालयामध्ये गेली होती. त्याचवेळी तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामध्ये अभिनेत्रीचे निधन झाले. प्रियाच्या नवजात बाळावर आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

एकुलत्या एका मुलीचे निधन झाल्यामुळे प्रियाच्या आईला आणि तिच्या नवऱ्याला मोठा धक्का बसला आहे. घरामध्ये नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्यामुळे प्रियाचे कुटुंबीय आनंद होते. पण अशामध्ये प्रियाचे निधन झाल्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रियाला कोणतीही आरोग्याची समस्या नव्हती, असं देखील सांगितले जात आहे.

प्रियाने 'करुथामुथू' या मालिकेमध्ये काम केले होते. या मालिकेतील तिच्या भूमिकेला चांगली पसंती मिळाली. या मालिकेत तिने अभिनेता किशोरसोबत स्क्रिन शेअर केली होती. पण गेल्या काही दिवसांपासून ती टीव्हीच्या जगापासून दूर होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मल्याळ टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री रंजूषा मेननचा मृत्यू झाला होता. घरामध्येत गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये तिचा मृतदेह सापडला होता. तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत सिद्धिविनायक दर्शनासाठी दाखल

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

SCROLL FOR NEXT