Actor Surya Health Saam Tv
मनोरंजन बातम्या

Surya Got Injured: शूटिंगदरम्यान साऊथचा प्रसिद्ध सुपरस्टार गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

Priya More

Actor Surya Health:

साऊथ सुपरस्टार (South Superstar) सूर्या सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'कंगुवा'मुळे (Kanguva Movie) चर्चेत आहे. सध्या सूर्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण या शूटिंगदरम्यान सूर्याचा अपघात झाला असून तो गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर चेन्नई येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सूर्या जखमी झाल्याची माहिती कळताच त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. ते त्याच्या लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिग्दर्शक सिरूथाई सिवा यांच्या 'कंगुवा' चित्रपटाचे शूटिंगच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुरू आहे. चेन्नईतील एका फिल्मसिटीमध्ये हे शूटिंग सुरू आहे. या फिल्मसिटीमध्ये निर्मात्यांनी भव्य सेट उभारला आहे. याठिकाणीच शूटिंग सुरू असताना अपघात झाला आणि सूर्या जखमी झाला. सध्या सूर्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,'कंगुवा'च्या शूटिंगदरम्यान एक सीन करत असताना रोप कॅमेऱ्याचे नियंत्रण सुटले आणि तो अभिनेता सूर्यावर पडला. सुदैवाने हा कॅमेरा सूर्याच्या डोक्यावर पडला नाही. खांद्यावर कॅमेरा पडल्यामुळे सूर्या जखमी झाला आहे. या अपघातानंतर तात्काळ शूटिंग थांबवण्यात आले. सेटवर उपस्थित असलेल्यांनी सूर्याला तात्काळ चेन्नई येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, चाहते अभिनेत्याच्या प्रकृतीसाठी आणि तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. सूर्याला किती दुखापत झाली आहे हे अद्याप कळाले नाही. नुकताच 'कंगुवा'च्या सेटवरील सूर्याचा नवा फोटो व्हायरल झाला असून या फोटोमध्ये अभिनेता एका चाहत्यासोबत बोलताना दिसत आहे.

'कंगुवा' मधील त्याच्या लूकसाठी सुर्याने बरेच किलो वजन कमी केले आहे. महत्वाचे म्हणजे या चित्रपटमध्ये त्याचे अनेक लूक पाहायला मिळणार आहे. कंगुवा हा सूर्याच्या कारकिर्दीतला हाय बजेट चित्रपट आहे. तसंच, निर्मात्यांनी हा अॅक्शन ड्रामा जगभरातील 38 भाषांमध्ये प्रदर्शित करण्याची प्लानिंग केली आहे. हा चित्रपट कधी रिलीज होणार याची घोषणा अद्याप झाली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT