South famous actress Samantha Ruth Prabhu  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Samantha Prabhu : सामंथा घेणार मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण, 'या' हिरोसोबत पहिल्यांदाच झळकणार

साउथची प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ही टॉलिवुडसोबत आता अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत दिसतेय. लवकरच ती एका प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : साउथची प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू(Samantha Prabhu) ही टॉलिवुडसोबत आता अनेक बॉलिवूड(Bollywood) सेलिब्रिटींसोबत दिसतेय. कधी सामंथा अक्षय कुमारसोबत डान्स करताना दिसते, तर कधी रणवीर सिंगसाठी पोस्ट शेअर करते. अलीकडेच ही अभिनेत्री वरुण धवनसोबत दिसली होती आणि आता हे दोन्ही स्टार्स एकाच प्रोजेक्टमध्ये काम करणार असल्याचे बोलले जात आहे. सामंथाचे आधीच काही असे अनेक चित्रपट आहेत, जे थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. आता ती मार्शल आर्ट्सवर आधारित ओटीटी प्रोजेक्ट साइन करण्यासाठी चर्चेत आहे.

माहितीनुसार, सामंथा एका वेब सीरिजमध्ये बॉलिवूड स्टार वरुण धवनसोबत काम करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, सामंथाच्या आगामी वेब सीरिजचे दिग्दर्शन इतर कोणीही नसून 'द फॅमिली २' चे दिग्दर्शक राज आणि डी. के करणार आहेत. ही सीरीज आंतरराष्ट्रीय वेब सिरीज 'सिटाडेल'चे भारतीय भाषेत केलेले रूपांतर असल्याचे म्हटले जाते.

या आगामी वेब सीरिजचे मुख्य कलाकार पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मार्शल आर्ट्सवर आधारित मालिकेसाठी प्रशिक्षण घेणार आहेत. ओटीटी प्रोजेक्टसना शोमध्ये हेवी-ड्यूटी अॅक्शन सीक्वेन्सची आवश्यकता असते. म्हणूनच निर्मात्यांनी मुख्य जोडी वरुण धवन आणि सामंथा यांना टोन्ड लुक देण्यास सांगितले आहे.

राज आणि डी.केसोबत सामंथाचा हा दुसरा प्रोजेक्ट असेल. तसेच, 'बिग बॉस सीझन ४', 'सॅम जॅम' आणि 'द फॅमिली मॅन: सीझन २' मध्ये काम केल्यानंतर, अभिनेत्रीचा हा चौथा वेब शो आहे, ज्यामध्ये ती आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या ती तिच्या आगामी 'कुशी' चित्रपटात व्यग्र आहे, ज्यामध्ये ती लायगर स्टार विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे 'शाकुंतलम' आणि 'यशोदा' सारखे चित्रपटही आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT