Rashmika Mandanna Love Life Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rashmika Mandanna Love Life: रश्मिकाचं विजय देवरकोंडासोबत ब्रेकअप? 'या' तेलुगु अभिनेत्याला करतेय डेट

अभिनेत्री रश्मिका मदांनाला विजय देवरकोंडा नाही तर तेलुगु अभिनेता आवडत असल्याचे समोर आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rashmika Mandanna News: दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. या दोघांच्या जोडीला चाहत्यांनाही पसंती दिली होती, लवकरच दोघांनीही विवाहबधंनात अडकावे अशीही त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. मात्र नुकत्याच आलेल्या माहीतीनुसार, 'मिशन मजनू' अभिनेत्री रश्मिका मदांनाला विजय देवरकोंडा नाही तर तेलुगु अभिनेता आवडत असल्याचे समोर आले आहे.

एका प्रसार माध्यमाच्या माहितीनुसार, रश्मिकाला तेलुगु अभिनेता बेलमकोंडा साई श्रीनिवास आवडत आहे. रश्मिका आणि बेलामकोंडा दोघेही अनेकदा स्पॉट झाले आहेत. त्यामुळेच सोशल मीडियावर दोघेही चर्चेत आहेत.

रश्मिका आणि बेलामकोंडा अलीकडेच मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते. यावेळी दोघांनीही कॅमेऱ्यासमोर पोझ दिल्या. दोघांनाही पापाराझीनी पहिल्यादांच कॅमेऱ्यात कैद केले आहे. यानंतर नुकत्याच पार पडलेल्या लोकप्रिय अवॉर्ड सोहळ्यात रेड कार्पेटवर पोझ दिल्या यावेळी उपस्थितांसह साऱ्याच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या.

सुत्रांच्या माहितीनुसार, दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. तर नॅशनल क्रश रश्मिकांच्या चाहत्यांना ती बेलमकोंडा साई निवास डेट करत असल्याच्या बातमीने धक्काच बसला आहे. अनेकांनी विजयसोबत तिचे ब्रेकअप झाले असल्याच्या अटकळ्या लावल्या आहेत. मात्र याबाबत अभिनेत्री रश्मिका आणि अभिनेता बेलमकोंडा दोघांनीही त्याच्या नात्याबाबत अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही.

रश्मिकाच्या कामाबद्दल बोलायचे तर, रश्मिका आगामी काळात रणबीर कपूरसोबत 'अ‍ॅनिमल' मध्ये दिसणार आहे आणि बेल्लमकोंडा साई श्रीनिवास वीवी विनायकच्या 'छत्रपती' मधून बी-टाऊनच्या पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Edited By: Manasvi Choudhary

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठ....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Raj Thackeray Look: डोळ्याला गॉगल अन् गळ्यात मफलर; विजयी मेळाव्यातील राज ठाकरेंचा स्टायलिश लूक

SCROLL FOR NEXT