South actress Shruti Narayan leaked video gets angry Saam Tv News
मनोरंजन बातम्या

Shocking Video : तुमच्या आया-बहिणींचा व्हिडिओ पाहा, लिंक मागू नका; कथित VIDEO लीक प्रकरणावरुन अभिनेत्री भडकली

Shruthi Narayanan Leak Video : हे एका व्यक्तीचं जीवन आहे, तुमचं मनोरंजन नाही. मी पीडितेला दोष देणाऱ्या अनेक टिप्पण्या आणि पोस्ट पाहिल्या आहेत. श्रुती नारायण तिला ट्रोल करणाऱ्या लोकांवर चांगलीच भडकलीय.

Prashant Patil

मुंबई : तामिळ अभिनेत्री श्रुती नारायणनचा कथित कास्टिंग काउच व्हिडिओ लीक झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरुन श्रुतीने या लोकांवरचा राग व्यक्त केलाय.

श्रुती नारायणने इंस्टाग्राम स्टोरीवर दोन पोस्ट केल्या होत्या ज्या आता काढून टाकण्यात आल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिले होते की, तुम्हा लोकांसाठी, माझ्याबद्दल असं काही पसरवणं जे मजेदार वाटतं असेल. तुम्हा सर्वांना मजा येत असेल. पण माझ्यासाठी आणि माझ्या जवळच्या लोकांसाठी ही खूप कठीण परिस्थिती आहे.

श्रुती पुढे म्हणाली की, मी देखील एक मुलगी आहे आणि मलाही भावना आहेत. माझ्या जवळच्या लोकांनाही भावना आहेत आणि तुम्ही लोकं ते वाईट करत आहात. तुमच्या आई, बहिण किंवा मैत्रिणीचे व्हिडिओ पाहा कारण त्या देखील मुली आहेत आणि त्यांचेही शरीर माझ्यासारखेच आहे, त्यामुळे जा आणि त्यांच्या व्हिडिओंचा आनंद घ्या, अशी पोस्ट करत श्रुती चांगलीच भडकलेली पाहायला मिळालीय.

South actress Shruti Narayan leaked video

संपूर्ण पोस्टमध्ये श्रुती नारायण तिला ट्रोल करणाऱ्या लोकांवर चांगलीच भडकलेली पाहायला मिळाली आहे. हे एका व्यक्तीचं जीवन आहे, तुमचं मनोरंजन नाही. मी पीडितेला दोष देणाऱ्या अनेक टिप्पण्या आणि पोस्ट पाहिल्या आहेत. पण मला पुरुषांना विचारायचं आहे की असे का? महिलांना नेहमीच वेगळा न्याय का दिला जातो? तर असे व्हिडिओ लीक करणाऱ्या आणि पाहणाऱ्यांना कोणीही प्रश्न विचारत नाही? यावर लोक ज्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत ते घृणास्पद आहे.

लिंक मागणं बंद करा, माणूस बनायला सुरुवात करा. सर्व महिलांचे शरीराचे अवयव सारखेच असतात, जसे की तुमची आई, आजी, बहीण किंवा पत्नी. ही काही मोठी गोष्ट नाही. हा केवळ व्हिडिओ नसून हा कोणाच्या तरी मानसिक आरोग्याचा आणि आयुष्याचा प्रश्न आहे. असं म्हणत दाक्षिणात्य अभिनेत्री भडकली आहे.

South actress Shruti Narayan leaked video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT