Pooja Hegde Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pooja Hegde: खरंच पूजा हेगडेला मिळाली जीवे मारण्याची धमकी?, समोर आलं खरं सत्य...

Pooja Hegde Get Death Threat: दुबईतील एका क्लबच्या उद्धाटनादरम्यान अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हे ऐकून पूजाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

Priya More

South Actress Pooja Hegde:

साऊथ फिल्म इंडस्ट्रीची (South Film Industry) प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेबाबत (Pooja Hegde) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) फेम या अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दुबईतील एका क्लबच्या उद्धाटनादरम्यान अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हे ऐकून पूजाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण आता पूजा हेगडेच्या टीमने या घटनेमागचे सत्य सांगितले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा हेगडे दुबईला एका क्लबच्या उद्घाटनासाठी गेली होती. पण आता ती भारतात परत आली आहे. विरल भयानीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची बातमी शेअर केली होती. त्यानंतर अभिनेत्रीचे चाहते तिच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करू लागले. मात्र, आता तिच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. या घटनेमागचे सत्य समोर आलं आहे.

अभिनेत्रीच्या टीमने सांगितले की, 'ही फेक न्यूज कोणी सुरू केली हे आम्हाला माहित नाही. ही पूर्णपणे खोटी बातमी आहे.' पूजाने अद्याप याबाबत मौन सोडलेले नाही आणि याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य अभिनेत्रीने जारी केलेले नाही. बुधवारी सकाळी पूजा हेगडे दुबईवरून मुंबईत परत आली. बेज क्रॉप टॉप आणि मॉम जीन्समध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती.

पूजा हेगडेच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, पूजा हेगडे शेवटची 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामध्ये सलमान खानसोबत दिसली होती. या चित्रपटात व्यंकटेश दग्गुबती, शहनाज गिल, राघव जुयाल, पलक तिवारी, जस्सी गिल, सिद्धार्थ निगम, विनाली भटनागर आणि विजेंदर सिंग हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत आहेत. पूजाने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या असून तिचे हे चित्रपट सुपरहिट देखील ठरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Crime: महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आरोपी पोलिसाचा थाट, मिळतेय VIP ट्रिटमेंट; राजेश जाधवचा नवा VIDEO समोर

Maharashtra Live News Update : सावंतवाडी, दोडामार्गमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

Cotton Saree Blouse Patterns: कॉटनच्या साडीवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, नक्की ट्राय करा

Tomato Facepack For Glowing Skin: चेहऱ्यावर हवीय गुलाबी चमक? मग 'या' पद्धतीने लावा टोमॅटोचा फेस पॅक

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; दोन बड्या नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा, अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT