film annapooorani Saam Tv
मनोरंजन बातम्या

Annapoorani Movie: नयनताराच्या 'अन्नपूर्णानी'विरोधात मुंबईत तक्रार दाखल, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

South Actress Nayantara Movie: शिवसेनेचे माजी नेते रमेश सोलंकी यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी काय कारवाई करतात हे महत्वाचे ठरणार आहे.

Priya More

FIR Against Annapoorani Movie Director:

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनताराच्या (Nayantara) 'अन्नपूर्णानी' चित्रपटाचे (Annapoorani Movie) निर्माते अडचणीत आले आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेचे माजी नेते रमेश सोलंकी यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी काय कारवाई करतात हे महत्वाचे ठरणार आहे. हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आणि भगवान रामाचा अपमान केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

6 जानेवारी रोजी रमेश सोलंकी यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट एक्सवर 'अन्नपूर्णानी' चित्रपटाला हिंदू विरोधी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी खुलासा केला की, त्यांना हा चित्रपट वादग्रस्त वाटला. हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देतो.' त्यांनी मुंबई पोलिस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कठोर कारवाई करण्याची आणि चित्रपटाच्या निर्मात्यांवर तसेच नेटफ्लिक्स इंडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली.

रमेश सोलंकी यांनी लिहिले की, 'ज्या वेळी संपूर्ण जग भगवान श्री राम मंदिराच्या अभिषेकच्या अपेक्षेने आनंदात आहे. अशावेळी झी स्टुडिओ, नाद स्टुडिओ आणि ट्रायडेंट आर्ट्स निर्मित अन्नपूर्णानी हा हिंदूविरोधी चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. एका हिंदू धर्मगुरूची मुलगी बिर्याणी शिजवताना नमाज पठन करते. या चित्रपटात लव्ह जिहादचे प्रमोशन करण्यात आले आहे. भगवान श्रीराम हे देखील मांसाहारी असल्याचे सांगून अभिनेता फरहानने अभिनेत्रीला मांस खाण्यास प्रवृत्त केले.'

त्यांनी या पोस्टमध्ये असेही लिहिले आहे की, 'चित्रपटातील अभिनेत्रीचे वडील एका मंदिराचे पुजारी आहेत. जे भगवान विष्णूला नैवेद्य देखील देतात. परंतु चित्रपटात त्यांची मुलगी मांस शिजवते, मुस्लिमाच्या प्रेमात पडते, रमजान इफ्तारसाठी जाणे आणि नमाज अदा करणे यांचा समावेश आहे. नेटफ्लिक्स इंडिया आणि झी स्टुडिओजने जाणूनबुजून हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी हा चित्रपट बनवला आहे आणि तो प्राण प्रतिष्ठाच्या आसपास प्रदर्शित केला आहे.', असा आरोपही त्यांनी केला आहे.

रमेश सोलंकी यांनी असंही म्हटलं आहे की, 'मी मुंबई पोलिस, मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, धार्मिक भावना दुखावल्याबद्दल या व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करावी. त्यांनी 'अन्नपूर्णानी'चे दिग्दर्शक नीलेश कृष्णा, अभिनेत्री नयनतारा, निर्माते जतिन सेठी, आर रवींद्रन आणि पुनित गोएंका, झी स्टुडिओचे मुख्य व्यवसाय अधिकारी शारिक पटेल आणि नेटफ्लिक्स इंडियाचे प्रमुख मोनिका यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवावी.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Egg Safety Facts: अंडे का फंडा! अंडी फ्रिजमध्ये ठेवावीत की नाही?

Maharashtra Live News Update: आगामी निवडणुकी साठी महायुतीची बैठक.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

SCROLL FOR NEXT