Sooryavanshi | दिग्दर्शक रोहित शेट्टी आशिष चंचलानीच्या भेटीला थेट उल्हासनगरात... 
मनोरंजन बातम्या

Sooryavanshi | दिग्दर्शक रोहित शेट्टी आशिष चंचलानीच्या भेटीला थेट उल्हासनगरात...

दिग्दर्शक रोहित शेट्टी आपला मित्र यूट्यूबर आशिष चंचलानी याला भेटण्यासाठी थेट उल्हासनगरमध्ये दाखल झाले होते. मित्राला दिलेले वचन रोहित शेट्टीने पूर्ण केले आहे.

अजय दुधाणे

उल्हासनगर: भारतातील प्रसिद्ध यूट्यूबर आशिष चंचलानी (Youtuber Ashish Chanchlani) हा युट्युब स्टार उल्हासनगर मध्ये राहतो. आशिषला रोहित शेट्टी (Rohit Shetty) याने तुला तुला भेटण्यासाठी मी उल्हासनगरमध्ये नक्की येईल असे वचन दिले होते, आज त्याने ते वचन पूर्ण केले आहे. रोहित शेट्टीची एक झलक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती, त्याच्यासोबत सेल्फी घेणाऱ्यांची गर्दी झाली होती, आणि रोहितनेही दिल खुलासपणे आपल्या फॅन्ससोबत सेल्फी काढली. (Sooryavanshi Director Rohit Shetty visited to Ulhasnagar for meet Ashish Chanchlani )

हे देखील पहा -

रोहित शेट्टीचा सुर्यवंशी (Sooryavanshi) हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून तो आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्याकरिता उल्हासनगरमध्ये आल्याचं बोललं जातं आहे. त्याच बरोबर आपल्या चित्रपटात नेहमी पोलिसांची भूमिका सकारात्मक दाखवत असतो म्हणून पोलिसांनी त्याचे स्वागत केला. तसेच कोरोनामुळे कुठल्याही फिल्म सिनेमागृहात रिलीज झालेल्या नव्हत्या, मात्र आता कोरोना कमी झालाय म्हणून फिल्म रिलीज झाले आणि यापुढेही सर्व व्यवस्थित होईल अशी भावना रोहित शेट्टीने व्यक्त केली.

रोहित शेट्टी आपला मित्र आशिष चंचलानीला भेटून थेट सेंट्रल पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि सेंट्रल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी रोहित शेट्टीला गुलाबाचे फूल देऊन स्वागत केलं, तसेच पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी ही रोहितचे गुलाब देऊन स्वागत केले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

SCROLL FOR NEXT