Artist’s Gulabi Sharara Dance Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Gulabi Sharara Song: तुझ्या क्रिएटिव्हीटी कसलीच तोड नाही; ११ दिवसात १५५ फ्रेममधून ‘गुलाबी शरारा’ गाण्याची तरुणाने बनवली रील

Chetan Bodke

Artist’s Gulabi Sharara Dance Viral Video

सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच वेगवेगळ्या युनिक कंटेंटच्या व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकांच्या युनिक कंटेंटची नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा सुद्धा होताना दिसते. भारतातल्या लोकांमध्ये असलेल्या क्रिएटिव्हीटीला (Creativity) तोड नाही, असं अनेकजण म्हणतात. याचाच प्रत्यय आता एका व्हिडीओतून आपल्याला आलेला आहे. (Viral Video)

सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीच्या क्रिएटिव्हीटीची प्रचंड चर्चा होताना दिसते. त्याने केलेल्या कामाचे नेटकऱ्यांमध्ये तुफान कौतुक केले जात आहे. त्याने एक नाही दोन नाही तर तब्बल १५५ फ्रेम्सवर चित्र काढत त्याने आपली कला सादर केली आहे. त्याने सादर केलेली कलाकृती पाहून तुम्हीही नक्कीच थक्क व्हाल. (Song)

सोशल मीडियावर सध्या ‘गुलाबी शरारा’ हे गाणं तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यावर फक्त सामान्य लोकच नाही तर, अनेक सेलिब्रिटींना सुद्धा गाण्यावर व्हिडीओ बनवण्याचा मोह आवरलेला नाही. अशातच एका मुलाने १५५ फ्रेम्सवर त्या गाण्यावरच्या हुबेहूब डान्स स्टेप्स रेखाटत सोशल मीडियावर आपली क्रिएटिव्हीटी सादर केली आहे. त्याची ही कला पाहून सर्वचजण अचंबित झाले. त्याला ह्या १५५ फ्रेम्सवर चित्र काढण्यासाठी जवळपास ११ दिवस लागले. त्याच्या ह्या कामाचे सर्वच कौतुक करीत आहेत. (Social Media)

व्हिडीओमध्ये, त्या महिलेने ऑरेंज कलरची साडी परिधान केलेली दिसते. अगदी हुबेहूब तिच्या डान्स स्टेप्स रेखाटले आहे. कला सादर केलेल्या कलाकाराचे नाव अमित असून त्याच्या @art_gallery_with_amit या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक जणांनी त्याने सादर केलेल्या अद्भुत कलेचे विविध शब्दात कौतुक करताना दिसत आहेत. ४४ लाखांहून अधिक त्या व्हिडीओला व्ह्यूज मिळाले असून ३.१ मिलियन पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. (Bollywood Film)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

SCROLL FOR NEXT