Sonam Kapoor New Home Instagram
मनोरंजन बातम्या

Sonam Kapoor New Home: नवरात्रीच्या मुहूर्तावर सोनम कपूरने खरेदी केलं अलिशान घर, PHOTO शेअर करत दिली ‘गुड न्यूज’

Sonam Kapoor News: सोनम कपूरने सोशल मीडियावर तिच्या नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत.

Chetan Bodke

Sonam Kapoor Shifted New Home

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. सोनम कपूरचा इन्स्टाग्रामवर जबरदस्त चाहतावर्ग आहे. नुकतंच सोनम कपूरने सोशल मीडियावर तिच्या नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत.

सोनम कपूर सोशल मीडियावर चाहत्यांसोबत खासगी आयुष्यातील अपडेट शेअर करत असते. नुकतंच अभिनेत्रीने दसऱ्याचे निमित्त साधत नवीन घरात शिफ्ट झाली आहे. अभिनेत्रीने पोस्टशेअर करताच तिला अनेक सेलिब्रिटी मित्रांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांना घराची गुड न्यूज देताना अभिनेत्रीने “आम्ही या आठवड्यामध्ये आमच्या नवीन घरात राहायला गेलो. आमचे मन आनंदाने आणि आशेने भरलेले आहे. आणि आम्ही या नव्या घरात नवीन आठवणी तयार करण्यासाठी उत्सुक आहोत.”

याआधी सोनम आणि पती आनंद अहुजासोबत लंडनमध्ये राहायला होती. आता तिने लग्नानंतर मुंबईमध्ये घर खरेदी केले आहे. सोनमने ही गुडन्यूज शेअर करताच अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. फिल्म मेकर करण बुलानी, करिष्मा कपूर, ईशा गुप्ता, हिरल भाटिया, सोनी राजदन यांनी सोनम कपूरला नवीन घराला शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनम कपूरच्या कामाबद्दल बोलायचे तर, लग्नानंतर सोनम कपूर अभिनय क्षेत्रामध्ये सक्रिय दिसली नाही. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्लाईंड’ चित्रपटामध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. आता सोनम कपूरच्या आगामी चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Gaikwad: जमीन विकून आमदाराची 25 लाखांची मदत, संजय गायकवाडांच्या मदतीवर काँग्रेसचा आक्षेप

Crime: विम्याच्या पैशांसाठी आई-वडील आणि बायकोची हत्या, तिहेरी हत्याकांडाचा तपास करताना पोलिसही चक्रावले

Wednesday Horoscope : वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाणार; ५ राशींच्या लोकांना शत्रूंचा त्रास संभवणार

Hair Care: केसाच्या अनेक समस्यांवर एक रामबाण उपाय; ताकाने केस धुण्याचे फायदे माहितीये का?

Maharashtra Politics: मीच बाळासाहेब ठाकरे" संदेश देताय का? – राऊतांचा शिंदेंना सवाल

SCROLL FOR NEXT