Sonam Kapoor saam Tv
मनोरंजन बातम्या

VIDEO: किड्स ब्रँडच्या या व्हिडिओवरून सोनम कपूरच्या बाळाचे नाव झाले उघड

सोनम कपूरने बाळासाठी कस्टमाईज्ड ब्लँकेट आणि कपडे बनवले होते, ज्यावर बाळाचे नाव लिहिले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर(Sonam Kapoor) आणि तिचा पती आनंद आहुजा (Anand Ahuja)यांच्या घरी काही दिवसांपूर्वीच नवा पाहुणा आला आहे. सोनमने २० ऑगस्ट रोजी बाळाला जन्म दिला. सध्या हे कपूर कपल खूपच आनंदी आहे. सोनम आणि आनंद यांनी त्यांच्या मुलाचं नाव अजून गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र, सोनमची बहीण रिया कपूरने बाळाचे टोपण नाव उघड केले होते. तिने सांगितले की ती बाळाला सिम्बा म्हणून हाक मारते. मात्र आता बाळाचे नाव समोर आले आहे.

सोनम कपूरने बाळासाठी कस्टमाईज्ड ब्लँकेट आणि कपडे बनवले होते, ज्यावर बाळाचे नाव लिहिले होते. बाळाचे नाव 'के आहुजा' आहे आणि चाहत्यांना असे वाटते की सोनमने तिच्या मुलाचे नाव ठेवले आहे, त्याचे पहिले अक्षर 'के' ने सुरू होते. सोनमच्या बाळासाठी कस्टमाईज्ड किड्स वेअर ब्रँडने एक व्हिडीओ पोस्ट करत त्याच्या कस्टमाईज्ड कपड्यांची झलक दाखवली आहे.

व्हिडीओ शेअर करताना, किड्स वेअर ब्रँडने लिहिले की, 'आम्ही सोनम कपूरला तिच्या आयुष्यातील या नवीन सुरुवातीसाठी शुभेच्छा देतो आणि तिच्या आनंदात एक छोटासा भाग झाल्याबद्दल तिचे आभार मानतो'. व्हिडीओमध्ये काही लहान मुलांचे कपडे आणि प्रोडक्ट आहेत. काही कपड्यांवर 'आहुजा' लिहिलेले आहे, तर एका आउटफिटवर 'बेबी के आहुजा' असे लिहिले आहे.

सोनम कपूरने डिलिव्हरीपूर्वी एका मासिकासाठी दिलेल्या मुलाखतीत चित्रपटांमध्ये पुनरागमनाबद्दल सांगितले. 'मी फक्त माझे काम करत आहे. मला वाटत नाही की काही बदलेल, माझं काम आता जसे चालू आहे, तसंच पुढेही चालू राहील. परंतु, प्राधान्यक्रम बदलेल आणि माझं बाळ माझ्यासाठी प्रथम प्राधान्य होईल. आई म्हणून मी त्याला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न नेहमी करेन', असे तिने सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaug Visarjan 2025 : लालबाग राजाच्या विसर्जनाला विघ्न, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

Heart-Touching Video : बाप्पाला घरी घेऊन चला, पाण्यात सोडू नका, शिवण्याचा बाबाकडे हट्ट, व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Maharashtra Live News Update: पुणे पोलिस गणपती मंडळांपुढे हतबल

Lalit Prabhakar : 'आरपार'नंतर ललित प्रभाकर हिंदी चित्रपटात झळकणार, सिनेमाचे नाव काय?

Amravati : बाप्पाला निरोप देताना घडले अघटित; अमरावती जिल्ह्यात तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT