Sonalee Kulkarni Saam TV
मनोरंजन बातम्या

Sonalee Kulkarni: अप्सराचा 'सालबर्डी'मध्ये हटके अंदाज; 'मंजुळा' गाण्यात सोनाली कुलकर्णीचा बोल्ड जलवा

Sonalee Kulkarni: ‘सालबर्डी’ चित्रपटातील ‘मंजुळा’ गाण्यात सोनाली कुलकर्णीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळणार आहे. आकर्षक कोरिओग्राफी, दमदार संगीत आणि भन्नाट स्टेप्समुळे गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Shruti Vilas Kadam

Sonalee Kulkarni: मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी सोनाली कुलकर्णी आता नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘सालबर्डी’ या चित्रपटातील ‘मंजुळा’ या खास गाण्यातून सोनालीचा दिलखेचक आणि हटके अवतार पाहायला मिळणार आहे. या गाण्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘मंजुळा’ हे आयटम साँग आकर्षक कोरिओग्राफी आणि भन्नाट स्टेप्समुळे विशेष ठरणार आहे. या गाण्याची कोरिओग्राफी फुलवा खामकर यांनी केली आहे. गाण्याचे बोल गुरु ठाकूर यांनी लिहिले असून संगीत पद्मनाभ गायकवाड यांनी दिले आहे. तर हे गाणे आनंदी जोशी हिने आपल्या सुरेल आवाजात सादर केले आहे.

या गाण्याबद्दल बोलताना सोनालीने सांगितले की, “हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. यामध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे. प्रेक्षकांना काहीतरी नवीन आणि मनोरंजक देण्याचा आमचा प्रयत्न आहे.” तिच्या या विधानामुळे ‘मंजुळा’ गाण्याबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

‘सालबर्डी’ या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली आहे. दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी यापूर्वी वेगळ्या धाटणीचे चित्रपट देत प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. आता ते ‘सालबर्डी’च्या माध्यमातून एक रहस्यमय आणि थरारक कथा घेऊन येत आहेत.

महाराष्ट्रातील दुर्गम भागातील ‘सालबर्डी’ गावाच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट भय, रहस्य आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा शोध घेणारा आहे. या मल्टीस्टारर चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे यांसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत झळकणार आहेत. एकूणच, आकर्षक कोरिओग्राफी, दमदार संगीत आणि सोनालीचा झिंग आणणारा अंदाज यामुळे ‘मंजुळा’ हे गाणे प्रेक्षकांसाठी व्हिज्युअल ट्रीट ठरणार आहे. त्यामुळे ‘सालबर्डी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT