Sonakshi- Zaheer Wedding Romantic Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonakshi- Zaheer Wedding : लग्नानंतर झहीर इक्बालने सोनाक्षी सिन्हाला सर्वांसमोर केलं किस, कुटुंबीयांसमोरच झाला रोमँटिक; पाहा VIDEO

Sonakshi- Zaheer Wedding Romantic Video : रजिस्टर पद्धतीने लग्न केल्यानंतर झहीरने सोनाक्षीला सर्वांसमोर किस केलं आहे. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. अखेर त्यांनी काल रजिस्टर पद्धतीने लग्नबंधनात अडकले आहे. या कपलचे लग्नानंतरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सोनाक्षी आणि झहीरच्या कुटुंबियांची झलक पाहायला मिळत आहे. रजिस्टर पद्धतीने लग्न केल्यानंतर झहीरने सोनाक्षीला सर्वांसमोर किस केलं आहे. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे.

सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. रजिस्टर पद्धतीने काल त्यांनी मुंबईमध्ये लग्न केले. लग्न केल्यानंतर झहीरने सासरे अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यासमोरच पत्नी सोनाक्षीला किस केले आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांचाही हा रोमँटिक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सोनाक्षीनेही आणि झहीरने सुद्धा सासू- सासऱ्यांचे आशीर्वाद घेतले. आशीर्वाद घेतानाचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी दोघांचेही कौतुक केले आहे.

लूकविषयी बोलायचे तर, लग्नामध्ये सोनाक्षीने ऑफ व्हाइट रंगाची साडी परिधान केली होती. तर झहीरनेही सोनाक्षीच्या कपड्यांना परफेक्ट मॅच होईल अशा कपड्यांची निवड केली आहे. यावेळी सोनाक्षीने साडीला फरफेक्ट मॅच होईल असा न्यूड मेकअप केला होता. ग्लॉसी मेकअपमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत होती. गळ्यात डायमंड नेकलेस आणि कानात झुमके असा साज सोनाक्षीने आपल्या लग्नात केला होता.

सोनाक्षी आणि झहीरने रजिस्टर मॅरेज केल्यानंतर मुंबईतल्या दादरमध्ये बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये सोनाक्षी-जहीरच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी झाली. शिल्पा शेट्टीच्या ह्या हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अख्खी बॉलिवूड इंडस्ट्री उपस्थित होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

SCROLL FOR NEXT