Sonakshi Sinha  Google
मनोरंजन बातम्या

Sonakshi Sinha Marriage: सोनाक्षीच्या लग्नामुळे कुटुंबात नाराजी; आईसह भावाने केलं अभिनेत्रीला अनफॉलो; हळदीला उपस्थित राहणार नाही कुटुंब?

Sonakshi Sinha Marrige News: सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोनाक्षीच्या लग्नामुळे मात्र सिन्हा कुटुंबात नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Siddhi Hande

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमी चर्चेत असते. सोनाक्षी सध्या तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत असते. सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्न करणार आहे. ती २३ जून रोजी बॉयफ्रेंड इकबालसोबत लग्न करणार आहे. मात्र, या लग्नामुळे सोनाक्षीचे कुटुंबिया नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांना लग्नाबद्दल काहीही माहित नसल्याचे सांहितले होते. त्यानंतर आता सोनाक्षीची आई आणि भाऊदेखील नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नामुळे तिच्या कुटुंबामध्ये नाराजी आहे. 'मुलीच्या लग्नाला मी उपस्थित राहिन. तिने मला सांगितल्यावर मी जाईन. पण मला याबद्दल काहीच माहित नाही', असं त्यांनी सांगितले होते. अशातच आता आई आणि भाऊदेखील सोनाक्षीच्या या निर्णयावर नाराज आहेत. सोनाक्षीच्या आईने आणि भावाने तिला सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचे दिसत आहे. सोनाक्षीच्या इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स लिस्टमध्ये आई पूनम आणि लव सिन्हा दिसत नाहीये. त्यामुळे सोनाक्षीच्या लग्नावरुन सिन्हा कुटुंबात नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. सोनाक्षीची हळद २० तारखेला होणार आहे. नुकतीच सोनाक्षीची बॅचलर्स पार्टी झाली. त्यानंतर आता हळदीचा कार्यक्रम होणार आहे. सोनाक्षीच्या या लग्नाला सिन्हा कुटुंब उपस्थित राहणार की नाही हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सोनाक्षीच्या लग्नाला जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गुढीपाडव्या आधी सोन्याने उच्चांक गाठला, सोनं १२००० रुपयांनी महागलं; वाचा आजचे २४ आणि २२ कॅरेटचे दर

Urine Infection Home Remedies: युरिन इन्फेक्शनचा त्रास होतोय? हे 5 घरगुती उपाय करा

Maharashtra Live News Update : मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची संधी; ११ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Nora Fatehi : 'घाणेरडे लिरिक्स, डान्स अन्...' ; अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, नोरा फतेही-संजय दत्तच्या गाण्याने संताप

SCROLL FOR NEXT