Sonakshi Sinha Engaged, Sonakshi Sinha Latest Marathi News Instagram
मनोरंजन बातम्या

सोनाक्षी सिन्हाने उरकला साखरपुडा? चाहत्यांना दिली खुशखबर, पण...

प्रत्येक फोटोमध्ये सोनाक्षी तिची अंगठी नक्कीच फ्लॉंट करताना दिसत आहे.

श्रेयस सावंत

मुंबई - शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने अचानक तिच्या चाहत्यांना सोशल मीडिया पोस्टद्वारे एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. सोनाक्षीने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती एका मिस्ट्री बॉयसोबत दिसत आहे, मात्र कोणत्याही फोटोमध्ये मिस्ट्री बॉयचा चेहरा दिसत नाही. पण प्रत्येक फोटोमध्ये सोनाक्षी तिची अंगठी नक्कीच फ्लॉंट करताना दिसत आहे. सोनाक्षीचे हे फोटो पाहून अभिनेत्रीने साखरपुडा केल्याचे दिसते. सोनाक्षीचे हे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Sonakshi Sinha Latest Marathi News)

आज माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे. माझ्या सर्वात मोठ्या स्वप्नांपैकी एक पूर्ण होत आहे… आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी थांबू शकत नाही असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. सोनाक्षीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तीन वेगवेगळे फोटो शेअर करून तिच्या साखरपुड्याची बातमी दिली आहे.

एका फोटोमध्ये दबंग गर्ल सोनाक्षी तिची रिंग फ्लॉंट करताना दिसत आहे. दरम्यान , सोनाक्षीचा जोडीदार कोण आहे यावर अद्याप सस्पेन्स कायम आहे, कारण अभिनेत्रीने फोटोंमध्ये तिच्या जोडीदाराचा चेहरा उघड केलेला नाही. दुसऱ्या फोटोमध्ये सोनाक्षी तिच्या जोडीदाराच्या खांद्यावर हात ठेवून पोज देताना दिसत आहे. त्याचवेळी, तिसर्‍या छायाचित्रात सोनाक्षी तिच्या जोडीदाराचा हात धरून पोज देत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach cancer symptoms: पोटाचा कॅन्सर की अ‍ॅसिडिटी? दोन्ही समस्यांमधील फरक कसा ओळखाल, शरीरातील बदलांकडे लक्ष द्या

Maharashtra Live News Update: सुवर्णनगरीत सोन्याचे दर १ लाख ५ हजारांवर

Ganpati Visarjan : पुण्यात गणेश विसर्जनाला गालबोट, मुळशीमध्ये युवक बुडाला

Viral Video: दुचाकी चोरी नये म्हणून खतरनाक जुगाड, तरूणाची शक्कल पाहून चोरही चक्रावले, पाहा व्हिडिओ

Hema Malini : हेमा मालिनी यांनी अंधेरीतील २ आलिशान फ्लॅट्स विकले; किती कोटींमध्ये झाली डील, नफा वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT