Urfi Javed  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: उर्फी जावेदची धडकी भरवणारी सोशल पोस्ट; म्हणाली, हे राजकीय लोक मला आत्महत्येस...

उर्फी जावेदच्या जीवाला राजकीय नेत्यांपासून धोका.

Pooja Dange

Urfi Javed Post On Instagram: उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचा सोशल मीडियावर वाद सुरू आहे. या वादात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेत चित्रा वाघ यांना सुनावले आहे. उर्फीने यावर सोशल मीडियावर पोस्ट करत मोठे वक्तव्य केले आहे.

काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी 'ही बाई ज्या दिवशी सापडेल त्या दिवशी तिचे थोबाड रंगवेन' असे म्हटले होते. त्यानंतर या दोघींचे सोशल मीडियावर वाद सुरु झाले. उर्फी विरोधात अनेक पोलिस स्थानकात तक्ररी दाखल करण्यात आल्या आहेत.

उर्फीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये उर्फीने म्हटले आहे की, राजकीय लोकांविषयी बोलणे खूप धोक्याचे असते. परंतु हे लोक मला आत्महत्या करण्यास भाग पाडत आहेत. यांच्यामुळे एकतर मी स्वतःला संपवेन किंवा हे माझी मानसिकता संपवतील. तसेच पुन्हा सांगते, मी हे सर्व सूरू केलेले नाही. मी कधीही कोणाचे वाईट केलेले नाही. ते लोक विनाकारण माझ्यावर आरोप करत आहेत.

Urfi Javed Instagram Story

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचा हा वाद अजून कुठपर्यंत जाईल हे सांगता येत नाही. परंतु यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. उर्फीची ही पोस्ट राजकीय नेत्यांवर काही परिमाण करेल का? या वादात कोण माघार घेईल? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

अमेरिकेचा विक्रम मोडला! नाशिकमध्ये 501 शंखांचा निनाद; थेट गिनीज बुकमध्ये नोंद|VIDEO

Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

Monday Horoscope : या 7 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; वाचा सोमवारचं राशीभविष्य

CM थलपती विजय यांच्यानंतर आणखी एक अभिनेता येणार राजकारणात; चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT