Misha Agarwal Saam Tv
मनोरंजन बातम्या

Misha Agrawal: सोशल मीडिया स्टार मीशाचा मृत्यू नव्हे तर आत्महत्या; ६ दिवसांनी झाला उलघडा

Misha Agrawal Passes Away : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मीशा अग्रवालच्या निधनाची बातमी 24 एप्रिल 2025 रोजी तिच्या समोर आली. निधनाच्या ६ दिवसांनंतर तिच्या घरच्यांनी तिने आत्महत्या केल्याचा खुलासा केला आहे.

Shruti Vilas Kadam

Misha Agrawal: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मीशा अग्रवालच्या आत्महत्येने तिच्या चाहत्यांना आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 24 एप्रिल 2025 रोजी तिच्या निधनाची बातमी समोर आली. सुरुवातीला तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नव्हते, मात्र सहा दिवसांनंतर तिच्या बहिणीाच्या नवऱ्याने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून तिच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट केले.​

त्या पोस्टनुसार, मीशा आपल्या इंस्टाग्राम फॉलोअर्स कमी झाल्यामुळे अत्यंत चिंतेत होती. तिचे ध्येय 1 मिलियन फॉलोअर्स मिळवण्याचे होते, परंतु फॉलोअर्स कमी होऊ लागल्याने ती स्वतःला अपयशी समजू लागली. एप्रिलपासून ती डिप्रेशनमध्ये गेली होती आणि अनेकदा तिच्या घरच्यांना मिठी मारून रडत म्हणायची की, 'माझे फॉलोअर्स कमी होत आहेत, माझे करिअर संपेल.'

मीशाच्या भावजींनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला की, इंस्टाग्राम हे तिच्या आयुष्य नाही तर आयुष्यातला एक भाग आहे. त्यांनी तिला तिच्या इतर कौशल्यांची आठवण करून दिली, जसे की तिची एलएलबीची पदवी आणि पीसीएसजे परीक्षेची तयारी. त्यांनी तिला सांगितले की, ती एक दिवस न्यायाधीश होऊ शकते आणि तिला करिअरची चिंता करण्याची गरज नाही. तथापि, मीशा या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करून सोशल मीडियाच्या दडपणाखाली आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.​

या घटनेने सोशल मीडियाच्यास्ट्रेसमुळे तरुणांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचे समोर येत आहे. विशेषत: इन्फ्लुएंसर्ससाठी, फॉलोअर्सची संख्या हे त्याच्यासाठी फार महत्वाचे बनले आहे, यामुळे त्यांना डिप्रेशन आणि चिंता यांसारख्या मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. तज्ज्ञांच्या मते, सोशल मीडियाचा अतिरेकी वापर मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो, यामुळे आत्महत्येच्या विचारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते .​

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT