Urfi Javed Instagram Account Gets Suspended Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Instagram Suspend: “स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात...”, उर्फीचं इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर नेटकऱ्यांची भन्नाट कमेंट

Urfi Javed News: नेहमीच विचित्र फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फीचं सोशल मीडिया अकाऊंट सस्पेंड झालं आहे. तिचे अकाऊंट सस्पेंड झाल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहे.

Chetan Bodke

Urfi Javed Instagram Account Gets Suspended

फॅशन इन्फ्लूएंसर उर्फी जावेद (Urfi Javed) कायमच आपल्या विचित्र फॅशनमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहते. नेहमीच विचित्र फॅशनमुळे चर्चेत राहणारी उर्फी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. आज उर्फीचं इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झालं आहे. उर्फीने याविषयीची माहिती स्वत: इन्स्टा स्टोरीवर स्क्रीनशॉट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. उर्फीचं अकाऊंट सस्पेंड झाल्याचा स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Social Media)

शेअर केलेल्या स्टोरीमध्ये, उर्फी जावेदने तिचं अकाऊंट सस्पेंड झाल्याचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यानंतर तिचं अकाऊंट रिकव्हर सुद्धा झालेलं आहे. तिने काही कम्यूनिटी गाईडलाईनचं पालन नं केल्यामुळे तिचं अकाऊंट सस्पेंड केल्याचं पाहायला मिळत आहे. उर्फीने इन्स्टाग्रामवर स्क्रीनशॉट शेअर करताना “आज अनेकांची इच्छा पूर्ण झाली” अशा आशयाचं कॅप्शन देत स्टोरी शेअर केली आहे. फक्त काही वेळासाठीच तिचे मेटाकडून इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड केलं होतं. (Bollywood News)

Urfi Javed Instagram Account Gets Suspended

पुन्हा अकाऊंट सुरु केल्यानंतर इन्स्टाग्राम टीमने उर्फीची माफीही मागितली आहे. तिचे अकाऊंट चुकून डिसेबल झाल्याचे सांगितले. उर्फी जावेदने या मेसेजचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. उर्फीला अनेकदा फॅशन अंगलट आली आहे. तिला विचित्र फॅशनमुळे नेटकऱ्यांनी बऱ्याचदा ट्रोलही केले आहे. इतकंच नाही तर, तिला अनेकदा गंभीर धमक्याही मिळाल्या आहेत. जीवे मारण्याच्या धमकीपासून ते रेपपर्यंतच्या धमक्या तिला मिळाल्या आहेत. ट्रोलर्सकडे उर्फी दुर्लक्ष करत आपल्या फॅशनकडे कायम लक्ष देते. (Trolled)

Urfi Javed Instagram Account Gets Suspended

उर्फी जावेदच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एकजण कमेंट करत म्हणतो, "ही गंभीर बाब आहे." तर आणखी एक जण म्हणतो, "एका क्रिएटरसाठी सोशल मीडिया अकाऊंट महत्त्वाचं असतं. या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होतो. खूप चांगला निर्णय, स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात." अशा अनेक वेगवेगळ्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहे. उर्फी हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. तिने अनेक सिरीयल्समध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. 'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT)चे पहिले पर्व उर्फीने चांगलेच गाजवले. स्प्लिट्सव्हिलामध्येही तिने सहभाग घेतला होता. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सिलिंडरसाठी 2 तासांपासून रांगेत; उन्हात उभ्या ६६ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण

Accident News : बाइकवरून निघाले, शाळेसमोरच्या रस्त्यावरच अघटित घडलं; जेसीबीच्या धडकेत २ तरुणांचा मृत्यू

संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं, मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी १९३ खासदार एकवटले, ७ गंभीर आरोप

काँग्रेसचे 6 आमदार नॉट रिचेबल; राज्याच्या राजकारणात भूकंप

SCROLL FOR NEXT