Urfi Javed Bollywood Debut Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Bollywood Debut: उर्फीचं नशीब फळफळलं, ‘या’ प्रसिद्ध निर्मातीच्या चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू

Urfi Javed New Film: नेहमीच वादाच्या अग्रस्थानी राहिलेली उर्फी जावेद लवकरच आपल्याला रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

Chetan Bodke

Urfi Javed in Love Sex Aur Dhoka 2: सोशल मीडिया एन्फ्ल्यूएंसर उर्फी जावेद हे नाव नेहमीच सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत राहतं. उर्फीच्या फॅशनमुळे अनेकदा वाद देखील निर्माण झाले आहेत. वादाच्या अग्रस्थानी राहिलेला हा चेहरा लवकरच आपल्याला रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. हो अगदी बरोबर वाचलंत, उर्फी लवकरच एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

उर्फीच्या चाहत्यांसाठी ही गुड न्युज म्हणावी लागेल. लवकरच उर्फी बॉलिवूड चित्रपटातून डेब्यू करणार असून सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीची तुफान चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्फी लवकरच एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहत्यांनी अभिनेत्रीच्या अनेक सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत ‘तुला आगामी चित्रापटाकरिता शुभेच्छा, उर्फी तुझं नशीब फळफळलं आता आम्ही तुला चित्रपटातून पाहणार’ अशा आशयाच्या कमेंट सध्या चाहते सोशल मीडिया पेजवर करत आहे.

आवडती अभिनेत्री लवकरच रूपेरी पडद्यावर झळकणार असल्याने चाहते खूपच आनंदित आहेत. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती एकता कपूरच्या ‘लव सेक्स और धोका २’च्या माध्यमातून उर्फी बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. ‘लव सेक्स और धोका’ला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षकांसह, सेलिब्रिटींनी आणि क्रिटिक्सनेही या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद दर्शवला. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी उर्फीला विचारणा करण्यात आली आहे. उर्फीच्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर व्हायरल झाले असून त्या चित्रपटाचे दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी करणार आहेत.

काही दिवसांपूर्वी उर्फीने सोशल मीडियावर ‘लव सेक्स और धोका २’च्या पोस्टरची स्टोरी देखील ठेवली होती. ते पोस्टर शेअर करताना अभिनेत्री म्हणाली होती की, “जेव्हा तुम्हाला लाइक्स आणि रिपोस्ट करता येतील तेव्हा तुम्हाला गुलाब आणि चॉकलेट मिळेल.” उर्फीसोबत या चित्रपटात ‘बिग बॉस १६’ फेम निमृत कौर अहलूवालिया देखील दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०१०मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या पहिल्या भागात राजकुमार राव, नुसरत भरुचा आणि अंशुमान झा महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. ‘लव सेक्स और धोका २’ पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. १६ फेब्रुवारी २०२४ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

उर्फी जावेद बद्दल बोलायचे तर, अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियवर आपल्या विचित्र आणि हटक्या फॅशन स्टाईलमुळे उर्फी जावेद कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर नेहमीच ती वेगवेगळ्या लुक्समध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. उर्फीने ‘मेरी दुर्गा’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेंमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. सोबतच अभिनेत्रीला खरी प्रसिद्धी मिळाली ‘बिग बॉस ओटीटी’ मुळे पहिल्या सीझनमध्ये अभिनेत्री सहभाग घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pen Fort : इतिहासप्रेमी अन् ट्रेकर्ससाठी पर्वणी! पेणजवळील 'या' ५ किल्ल्यांची सफर तुम्हाला नक्की आवडेल

Protein Supplements: प्रोटीन सप्लीमेंटमुळे कोलेस्ट्रॉल वाढतंय? डॉक्टरांनी सांगितलं कोणत्या व्यक्तींना असतो धोका

Ramayana Collection : रणबीर कपूर-यशच्या 'रामायण'ची जगभरात धूम! १,११० कोटींची कमाई करत मोडले अनेक रेकॉर्ड

Shocking : मोठी बातमी! भाजप नेत्याच्या धावत्या कारला भीषण आग; दोघांनी कारमधून उडी मारली अन्...

Maharashtra News Live Update: ऐन दुष्काळी परिस्थितीत अमरावतीत नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर ओली पार्टी रंगली

SCROLL FOR NEXT