Urfi Javed Visit Golden Temple Instagram
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Visit Golden Temple: डोक्यावर ओढणी, भक्तीत तल्लीन...; उर्फी जावेदने सुवर्ण मंदिरात टेकला माथा

Urfi Javed Photos: नुकतंच उर्फी जावेदने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय.

Chetan Bodke

Urfi Javed Visit Golden Temple

कायमच कोणत्या ना कोणत्या हटक्या आणि विचित्र फॅशन सेन्समुळे उर्फी जावेद प्रकाशझोतात राहते. गेल्या काही दिवसांपुर्वी तिने छोटे कपडे घातल्यामुळे पोलिस अटक करत असल्याचे दाखवले होते. तिचा हा बनावट व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

खरंतर, हा प्रमोशनल व्हिडिओ असल्याचे तिने स्वत:च सांगितले. तिच्या पोस्टवर मुंबई पोलिसांनी कारवाई होईल अशी प्रतिक्रियाही दिली होती. यानंतर उर्फी दुबईला पळाली होती. नुकतंच ती भारतात परतली असून तिने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

सोशल मीडियावर ती दर्शन घेत असल्याचा फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. सुवर्ण मंदिरामध्ये दर्शन घेतानाचे फोटो उर्फीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिनेत्रीने सुवर्ण मंदिरातला फोटो शेअर करताना, ‘वाहेगुरु’ असं कॅप्शन दिला आहे. नव्या फोटोमध्ये उर्फी एकदम संस्कारी मुलीसारखी दिसून येत आहे. कायमच विचित्र फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फी जावेदचा हा नवा लूक चाहत्यांना फारच भावलेला दिसतोय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उर्फी जावेद बुधवारी सुवर्ण मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळी तिच्यासोबत तिच्या बहीणीनेही सुवर्ण मंदिरामध्ये दर्शन घेतले. उर्फीच्या नव्या लूकवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे. ' तू नक्की उर्फीच आहेस ना? का दुसरी कोण आहे?', 'उर्फी तू असेही कपडे घालतेस का?' अशा कमेंट पोस्टवर आल्या आहेत. (Social Media)

उर्फी जावेदच्या करिअबद्दल सांगायच तर, ती २०१६ मध्ये 'बडे भैया की दुल्हनिया'या टिव्ही शोमधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले आहे. त्यानंतर तिने बरेच टिव्ही शो केले, पण तिला काही प्रसिद्धी मिळाली नाही. याशिवाय उर्फी 'बिग बॉस ओटीटी' आणि 'स्प्लिट्सव्हिला' सारख्या शोमध्येही स्पर्धक म्हणून दिसली होती. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT